

2025 मध्ये चित्रपटसृष्टीने अनेक प्रिय कलाकारांना गमावले. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली, पण त्यांनी मागे सोडलेल्या असंख्य आठवणी आणि कलाकृती आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत.
यंदाचे २०२५ हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी भावनिक आणि वेदनादायी ठरले आहे. या वर्षी चित्रपटसृष्टीने काही असे कलाकार गमावले, ही निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या अभिनयाने, सदाबहार व्यक्तिमत्त्वाने आणि कलेने लाखो चाहत्यांच्या हृदयात अमिट ठसा उमटवणाऱ्या कलाकारांनी जगाला अलविदा म्हटले. त्यांच्या जाण्याचा शोक असला तरी मागे राहिलेल्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम टिकून आहेत.
जुबीन गर्ग - १९ सप्टेंबर
लोकप्रिय आसामी गायक जुबीन गर्ग (Zubeen Garg) सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात त्यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते आणि पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह भारतात आणण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या प्रकरणातील अनेकांना अटक करण्यात आली आहे.
कामिनी कौशल - १४ नोव्हेंबर
जेष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल (Kamini Kaushal) यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. २०२२ मध्ये, त्या आमिर खानच्या "लाल सिंग चड्ढा" चित्रपटात दिसल्या होत्या.
शेफाली जरीवाला - २७ जून
वयाच्या ४२ व्या वर्षी कांटा लगा फेम गर्ल शेफाली जरीवालाने (Shefali Jariwala) मुंबईत जगाचा निरोप घेतला. रिकाम्या पोटी औषध घेतल्यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला, ज्यामुळे तिला चक्कर आली, तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे म्हटले जाते.
असरानी - २० ऑक्टोबर
वयाच्या ८४ व्या वर्षी अभिनेते असरानी (Asrani) यांचे निधन झाले. शोले, मालामाल विकली यातील अविस्मरणीय अभिनय आणि संवाद आजही अजरामर आहेत. आरोग्याच्या समस्यांशी संबंधित ते पिडीत होते.
सतीश शाह - २५ ऑक्टोबर
हरहुन्नरी अभिने सतीश शाह ( Satish Shah) वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. किडनीच्या समस्यांशी ते ग्रस्त होते. जाने भी दो यारों, भूतनाथ, असे अनेक हिट चित्रपट तर साराभाई विरुद्ध साराभाई टीव्ही मालिकेतून ते लोकप्रिय होते.
पंकज धीर- १५ ऑक्टोबर
बीआर चोप्रा यांच्या "महाभारत" या चित्रपटात कर्णाची भूमिका पंकज (Pankaj Dheer) यांनी साकारली होती. त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले.
मनोज कुमार- ४ एप्रिल
अभिनेता, दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. पूरब पश्चिम, उपकार यासारखे सर्वोत्तम चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
धर्मेंद्र - २४ नोव्हेंबर
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra ) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. काही काळापासून ते आजारी होते. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज होणार आहे.
वरिंदर सिंह घुमान (९ ऑक्टोबर), सुलक्षणा पंडीत (६ नोव्हेंबर), मुकुल देव (२३ मे), अच्युत पोतदार (१८ ऑगस्ट), मधुमती (१५ ऑक्टोबर), दया डोंगरे (३ नोव्हेंबर) या कलाकारांनीही यावर्षी जगाचा निरोप घेतला.