

‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड करत अहान पांडेच्या ‘सैयारा’ला कमाईत मागे टाकले आहे. प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण कमाईमुळे ‘धुरंधर’ हा 2025 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
५ डिसेंबरला रिलीज झालेल्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ दहा दिवसात आपली ताकद सिद्ध केली आहे. रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने सातत्याने कमाई गती कायम ठेवलीय. आता त्याने अहान पांडेच्या ‘सैयारा’ चित्रपटाला कमाईच्या शर्यतीत मागे टाकले आहे.
रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाचा चित्रपट धुरंधरने ब्लॉकबस्टर सैयाराला मागे टाकले आहे. सैयारा ची ३३७ कोटींची कमाई मागे टाकत धुरंधर २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मोठा चित्रपट ठरला आहे. केवळ १० दिवसात धुरंधरने ३५० कोटींची कमाई केली.
१० व्या दिवशी ५८.२० कोटी रुपये निव्वळ (भारत) जबरदस्त कमाई केली. विकेंडचा फायदा देखील भरपूर झाला. धुरंधरने प्रत्येक मापदंड पार करत एका हिंदी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा रविवार नोंदवला. ज्यामुळे त्याचे भारतातील एकूण कलेक्शन ३६४.६० कोटी रुपये निव्वळ आणि जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ५५२.७० रुपये कोटी झाले आहे.
प्रत्येक दिवशी कमाईचा आलेख वाढत गेलेला दिसतोय. सर्वात मोठा दुसरा शुक्रवार, सर्वात मोठा दुसरा शनिवार, सर्वात मोठा दुसरा रविवार, हाऊसफुल्ल शो, मध्यरात्रीचे शो आणि चोवीस तास स्क्रीनिंगमुळे सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे.
धुरंधर कलेक्शन-
पहिला आठवडा: २१८.०० कोटी
दुसरा शुक्रवार: ३४.७० कोटी
दुसरा शनिवार: ५३.७० कोटी
दुसरा रविवार: ५८.२० कोटी
एकूण (भारत): ३६४.६० कोटी निव्वळ, ४३०.२० कोटी ग्रॉस कलेक्शन
परदेशातील एकूण (१० दिवस): १२२.५० कोटी रुपये
जगभरातील एकूण: ५५२.७० कोटी रुपये
जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजचा आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जगभरात विक्रम मोडत आहे. "धुरंधर" चित्रपटातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रणवीर सिंग हमजा या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे आणि अक्षय खन्ना दरोडेखोर रहमानच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात संजय दत्त, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत.