

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, सून-सासूच्या नात्यातील भावनिक पैलू, दैनंदिन संघर्ष आणि प्रेमळ नातेसंबंध यांचे सुंदर चित्रण त्यातून दिसून येते. ट्रेलर पाहता हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Trailer out
मराठी चित्रपटसृष्टीत कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. अशाच एका भावनिक आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट सून-सासूच्या नात्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. प्रत्येक पातलीवर वेगवेगळ्या दृष्टीकोणातून चित्रपटाचे विविध पैलू पाहता येणार आहे.
ट्रेलरमधून दिसणारी कथा ही प्रत्येक घरात कुठे ना कुठे घडणाऱ्या प्रसंगांशी जोडलेली आहे. सून आणि सासू यांच्यातील संवाद, गैरसमज, मतभेद तसेच हळूहळू निर्माण होणारे आपुलकीचे नाते ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमधील संवाद कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट नात्यांची किंमत, समजूतदारपणा आणि सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करतो. ट्रेलर पाहता चित्रपटात विनोद, भावना आणि नात्यांतील वास्तव यांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुप्रतीक्षित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोहळा पार पडला. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस देखील यावेळी टीमने केक कापून साजरा केला.
सासू सुनेचं नातं पाहिलं तर घरोघरी मातीच्या चुली अशी परिस्थिती असते. पण, याहीपलिकडे जाऊन एक वेगळं नातं असतं. या नात्याचे नवे पैलू उलगडणारा चित्रपट म्हणजे अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? आहे
ट्रेलरमध्ये काय?
ट्रेलरमध्ये सासू-सूनेच्या नात्याचे केवळ आदर्श रूप नाही, चांगले-वाईट पैलू, संघर्ष आणि भावनिक क्षण दिसताहेत. हसवत हसवत विचार करायला भाग पाडणारी चित्रपटाची कहाणी आहे. स्त्रियांनी एकमेकींना समजून साथ दिल्यावर त्यांचे नाते अधिक दृढ होते, असा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा एक मनोरंजक व कौटुंबिक चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा चित्रपट घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे.
केदार शिंदे, दिग्दर्शक
चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांचे, सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त, पटकथा वैशाली नाईक यांची आहे. चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.