

Dhurandhar 2 Release Date: रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर काही दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दमदार कथा, जबरदस्त अॅक्शन आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा टिकवून ठेवणाऱ्या सिनमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाच्या शेवटीच ‘धुरंधर 2’ ची घोषणा करण्यात आली होती आणि आता या सीक्वेलबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
निर्मात्यांनी सांगितलं की ‘धुरंधर 2’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त हिंदीतच नाही, तर तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा एकूण पाच भाषांमध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘धुरंधर 2’ ही पॅन-इंडिया फिल्म असणार आहे.
‘धुरंधर’ या स्पाय अॅक्शन थ्रिलरचं लेखन, दिग्दर्शन आणि सह-निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा एका गुप्तहेराच्या धाडसी मोहिमेभोवती फिरते. पाकिस्तानच्या कराची शहरातील अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव करून दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्याचं आव्हान या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. शेवटच्या टप्प्यावर चित्रपट जिथे थांबतो, तिथूनच दुसऱ्या भागाची उत्सुकता अधिक वाढते.
‘धुरंधर’ने कमाईच्या बाबतीतही नवे विक्रम केले आहेत.
▪️ पहिल्या आठवड्यात सुमारे 218 कोटी रुपये
▪️ दुसऱ्या आठवड्यात 261.5 कोटी रुपये
▪️ 20व्या दिवशी सुमारे 17 कोटींची कमाई केली
आतापर्यंत या चित्रपटाने 637 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विशेषतः दक्षिण भारतात चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे सीक्वेल बहुभाषिक करण्याचा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे.
आता ‘धुरंधर 2’ मध्ये पुढे काय घडणार, गुप्त मोहिमेचा शेवट कसा होणार आणि रणवीर सिंगचा प्रवास कसा असणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. पाच भाषांतील रिलीजमुळे हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक इव्हेंटपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.