Bigg Boss Marathi - 6 | 'मला हे घर घाण नकोय'.. राखीनं एकेकाला सुनावलं; राकेश बापट, तन्वीला लागली तिखट मिरची

Bigg Boss Marathi - 6 | 'मला हे घर घाण नकोय'.. राखीनं एकेकाला सुनावलं; राकेश बापट, तन्वीला लागली तिखट मिरची
Bigg Boss Marathi - 6
Bigg Boss Marathi - 6 updates pudhari photo
Published on
Updated on
Summary

'बिग बॉस मराठी ६' च्या घरात राखी सावंतच्या उपस्थितीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत असतानाच आता घरात मोठा वाद पाहायला मिळत आहे. घरातील अस्वच्छता आणि कचरा पाहून राखीचा पारा चढला असून तिने थेट "मला हे घर घाण नकोय" असं म्हणत सर्व स्पर्धकांना धारेवर धरले आहे. विशेषतः राकेश बापट आणि तन्वी यांना राखीने स्वच्छतेवरून खडे बोल सुनावले, ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राकेश आणि तन्वीने यावर काय प्रतिक्रिया दिली?

Bigg Boss Marathi - 6 latest updates

'बिग बॉस मराठी'च्या घरातील खेळाला आता वेगळेच वळण लागले आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे याही सीझनमध्ये ड्रामा आणि वादाची कमतरता नाही. त्यातच जेव्हापासून राखी सावंतची घरात एन्ट्री झाली आहे, तेव्हापासून घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. राखी नेहमीच तिच्या रोखठोक विधानांसाठी ओळखली जाते आणि यावेळी तिचा रोष घरातील अस्वच्छतेवर निघाला आहे.

Bigg Boss Marathi - 6
Peddi Ram Charan First Look | हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

नुकत्याच समोर आलेल्या भागात राखी सावंतने घरातील कचरा आणि पसरलेली घाण पाहून आपला संताप व्यक्त केला. किचन कट्टा, लिव्हिंग एरिया आणि सिंकमध्ये पडलेली अस्वच्छ भांडी पाहून राखीचा पारा चढला. तिने सर्व स्पर्धकांना चांगलेच धारेवर धरले.

राखी घरामध्ये सर्वांना म्हणते- 'कुणी चहा बनवलेला?'राकेश म्हणतो की-' कॅप्टन आहेस का?'राखी म्हणते-' कॅप्टनही आहे, सदस्यही आहे. मला हे घर घाण नकोय.' यावर राकेश म्हणतो- 'तुमच्या बे़डच्या बाजून आवरा आधी.' यावर राखी म्हणते-'आम्हाला येत नाही.' राकेश म्हणतो-'मग आम्हालाही येत नाही...'

दरम्यान, तन्वी कोलते राखीला म्हणते-'राखी हेच वाक्य आरशात जाऊन उभी राहा आणि बोल.'

राखीची ही ऑर्डर ऐकून राकेश बापट आणि तन्वी कोलतेला तिखट मिरची लागलीय. घरात बाचाबाचीचे वातावरण पाहायला मिळाले.

Bigg Boss Marathi - 6
Peddi Ram Charan First Look | हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

राखी सावंतच्या या पावलामुळे प्रेक्षक मात्र खूप खूश आहेत. सोशल मीडियावर चाहते राखीचे कौतुक करत आहेत. तर तन्वीने दिलेल्या उत्तराला देखील नेटकरी हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news