Dhurandhar 2 Box Office: ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 9 दिवसांत किती कोटी कमावले? या दोन चित्रपटांना टक्कर देणार

Dhurandhar 2 Box Office Collection Day 9: ‘धुरंधर 2’ने फक्त 9 दिवसांत 715 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. चित्रपट दररोज 40 कोटींपेक्षा जास्त कमाई करत विक्रम मोडत आहे.
Dhurandhar 2 Box Office Collection Day 9
Dhurandhar 2 Box Office Collection Day 9Pudhari
Published on
Updated on

Dhurandhar 2 Box Office Collection Day 9: बॉक्स ऑफिसवर सध्या एकच नाव गाजत आहे ते म्हणजे धुरंधर 2. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, सारा अर्जुन, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’चा दबदबा

‘धुरंधर 2’ने रिलीजपासूनच तुफान कमाईची सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने तब्बल 624.47 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतरही चित्रपटाची कमाई थांबलेली नाही.

रिलीजच्या 8व्या दिवशी चित्रपटाने 49.70 कोटींची कमाई केली, तर 9व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी तब्बल 41.55 कोटींची कमाई केली आहे. यासह ‘धुरंधर 2’ची भारतातील एकूण कमाई 715.72 कोटींवर पोहोचली आहे.

Dhurandhar 2 Box Office Collection Day 9
Sreeleela | साऊथ सुंदरी श्रीलीलाचा संजू राठोडच्या ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर ठेका, मराठमोळ्या नऊवारी साडीमध्ये खुललेले सौंदर्य पहाच!

रोज 40 कोटींचा आकडा पार

या चित्रपटाची खास बाब म्हणजे दररोज 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळेच अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

‘धुरंधर 2’ आता बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत जाण्याच्या मार्गावर आहे.
या चित्रपटाने आधीच पठाण, जवान आणि स्त्री 2 सारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

आता या चित्रपटासमोर दोन मोठे टार्गेट आहेत ते म्हणजे पुष्पा 2 (हिंदी कलेक्शन 836.09 कोटी) आणि त्याचाच प्रीक्वेल धुरंधर (894.49 कोटी)

Dhurandhar 2 Box Office Collection Day 9
Peddi Ram Charan First Look | हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

विकेंडमध्ये वाढणार कमाई

तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या शनिवार-रविवारी चित्रपटाची कमाई पुन्हा वाढू शकते. जर हा ट्रेंड कायम राहिला, तर ‘धुरंधर 2’ लवकरच 800 कोटींचा टप्पा पार करू शकतो. हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज झाला असून, देशाच्या गुप्तहेर यंत्रणेवर आधारित आहे. रणवीर सिंगसह सारा अर्जुन, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news