Dhurandhar The Revenge Trailer | ‘ल्यारी का बादशाह’ रणवीर सिंहचा पुन्हा ॲक्शन धमाका, आदित्य धरच्या 'धुरंधर' सीक्वेलचा जबरदस्त ट्रेलर

Dhurandhar The Revenge Trailer -धडाकेबाज अॅक्शन, दमदार डायलॉग्ज, ‘धुरंधर २’चा ट्रेलर रिलीज, फॅन्स म्हणाले – ब्लॉकबस्टर पक्की
ranveer singh
ranveer singh film Dhurandhar 2 Trailer released x account
Published on
Updated on
Summary

रणवीर सिंहच्या आगामी ‘धुरंधर 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या सीक्वेलमध्ये जबरदस्त अॅक्शन, दमदार डायलॉग्स आणि थरारक सीन पाहायला मिळत आहेत. रणवीर सिंहचा अॅक्शन अवतार पाहून चाहते उत्साहित झाले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Dhurandhar 2 Trailer out now

धुरंधर २ मध्ये मुख्य अभिनेता रणवीर सिंहला ल्यारीच्या सर्वात मोठ्या शत्रूंशी लढा द्यायचा आहे. त्याची एक झलक आता ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आदित्य धर यांनी धुरंधरचा सीक्वेल ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय

रणवीर सिंह जसकीरत उर्फ ​​हमजाची भूमिका पुन्हा साकारताना दिसत आहे. दमदार अॅक्शन, थरारक दृश्ये आणि जबरदस्त डायलॉग्जमुळे ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. यापूर्वीही त्यांनी अॅक्शन आणि देशभक्तीवर आधारित चित्रपटांमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘धुरंधर २’ या सीक्वेलमध्ये त्यांनी अधिक भव्य कथा आणि रोमांचक दृश्ये आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते.

धुरंधर २ च्या ट्रेलरमध्ये काय दाखवले आहे?

चित्रपटाच्या निर्मात्यांनी शनिवारी त्याचा ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यामध्ये पहिल्या भागाचा कहाणीचा शेवटचा भाग दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंह, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुनची दृश्ये आहेत.

ranveer singh
The 50 Rajat Dalal |'द-५०'च्या टास्कमध्ये रजत दलालला मोठी दुखापत, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून फोटो व्हायरल, प्रकृतीबद्दल अपडेट समोर

धुरंधर २च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग यावेळी जसकीरतच्या भूमिकेत परतला आहे. तो ल्यारी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये तो पुढचा 'ल्यारी का बादशाह' असल्याचेही दाखवले आहे. पहिल्या भागात तो एका भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत दिसला होता. रहमान डकैत (अक्षय खन्ना) चालवत असलेल्या बलोच टोळीत तो घुसखोरी करतो. आत धुरंधर २ मध्ये ही कथा पुढे जाईल. सिक्वेलमध्ये जसकीरत एका दहशतवादी संघटनेला पाडण्यासाठी टोळीच्या आतून कसे काम करतो, दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

धुरंधर २ ट्रेलर पाहून काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी रणवीर सिंहच्या अभिनयाचे कौतुक केले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा हिट ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही चाहत्यांनी ट्रेलर पाहून ‘ब्लॉकबस्टर लोडिंग’ असेही म्हटले आहे.

ranveer singh
Rashmika -Vijay Music Ceremony | रश्मिका-विजयचा संगीत लूक व्हायरल, चमचमत्या लेहेंग्यात रॉयल अंदाज (Video)

धुरंधर २ कधी रिलीज होणार?

धुरंधर-२ चित्रपट १९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर २’ हा चित्रपट अॅक्शन आणि थराराने भरलेला असणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. रिपोर्टनुसार, कथेचा प्लॉट, म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी यामुळे चित्रपटाची भव्यता अधिक असमार आहे. मुळचा धुरंधर गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर तो ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता सीक्वेल देखील सुपर डुपर हिट ठरेल, असे म्हटले जात आहे. धुरंधरने जगभरात १३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. हा चित्रपट फक्त हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news