Dharmendra Discharge: मृत्यूच्या सगळ्या अफवांना मागे सारत धर्मेंद्र हॉस्पिटलहून घरी परतले ; यानंतर लगेचच देओल कुटुंबियांचे स्टेटमेंट समोर

गेले काही दिवस त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते
Entertainment
dharmendraPudhari
Published on
Updated on

गेले काही दिवसांपासून दिग्गज अभिनेता धर्मेंद्र हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण या सगळ्यांना मागे सारत धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला आहे. (Latets Entertainment News)

धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी याबाबत एक स्टेटमेंटही जारी केले आहे. यामध्ये धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अफवा न पसरवण्याचे तसेच कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

Entertainment
Social Media Detox: टेलिव्हिजनच्या 'देवमाणसा'चा सोशल मिडियाला रामराम; शेवटची पोस्ट शेयर करत म्हणतो....

काय आहे या स्टेटमेंटमध्ये?

यात लिहिले आहे की ' श्री धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. आता घरी त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जाईल. आम्ही माध्यम आणि इतर जनतेला विनंती करतो की ते इथून पुढे कोणतीही अंदाजे बातम्या देणार नाहीत. या काळात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला जावा. ते लवकर बरे होण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा, दिलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही आभारी आहोत. त्यांचा आदर करा . त्यांचेही तुमच्यावर तितकेच प्रेम आहे.’

Entertainment
Dharmendra Net Worth: सनी देओल की ईशा देओल? धर्मेंद्र यांच्या संपत्तीमधील सर्वात जास्त वाटा कुणाला मिळणार?

धर्मेंद्र यांना सकाळी 7.30 वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला गेला. त्यांच्यावर आता घरीच उपचार केले जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. धर्मेंद्र यांना 10 ऑक्टोबरला हॉस्पिटलला अॅडमिट केल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून तब्येत आणखी बिघडल्याच्या आणि त्यांच्या निधनाच्या बातम्यांनी जोर पडकला. पण ईशा आणि हेमामालिनी यांनी सोशल मिडियावर या वृत्ताचे खंडन करत माध्यमांना चांगलेच सुनावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news