

बॉलीवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या बरी नाही. ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानंतर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते आहे. बॉक्स ऑफिसवर धर्मेंद्र यांच्या सिनेमांनी यशस्वी कामगिरी केली. त्यामुळेच धर्मेंद्र यांनी आपल्या दोन्ही कुटुंबासाठी बऱ्यापैकी संपत्ती कमवून ठेवली आहे. सध्या धर्मेंद्र फार्म हाऊसवर पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात. जाणून घेऊया धर्मेंद्र यांच्या संपत्तीविषयी (Latest Entertainment News)
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 400 ते 450 कोटी रुपये इतकी आहे. वयाच्या 89 व्या वर्षीही धर्मेंद्र सिनेमातून काम करत आहेत. त्यांचा सिनेमा इक्कीस या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमांशिवाय अनेक ब्रॅंडस आणि गुंतवणुकीतूनही धर्मेंद्र यांची कमाई होते.
धर्मेंद्र यांची प्रसिद्ध रेस्टॉरंट चेनही आहे. ज्याचे नाव 'गरम- धरम' आहे. याशिवाय अनेक लक्झरी कार्सची मालकीही धर्मेंद्र यांच्याकडे आहे.
पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून धर्मेंद्र यांना 4 मुले आहेत. सनी, बॉबी, आजिता आणि विजेता अशी त्यांची नावे आहेत. तर धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमामालिनी यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत.
धर्मेंद्र यांना 6 मुलांची मिळून जवळपास 13 नातवंडे आहेत
हेमामालिनी या धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहेत. त्यांचे दुसरे लग्न हिंदू मॅरेज अॅक्ट नुसार वैध मानली जात नाही. पण त्या लग्नापासून झालेल्या मुली मात्र कायद्याने वारस मानले जातात. कलम 16 (1) नुसार अशा मुलांचा त्यांच्या आई - वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण हक्क असेल. पण हा हक्क आई-वडिलांच्या संपत्तीवरच सीमित असणार आहे. संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीवर त्यांचा काही एक अधिकार असणार नाही.
त्यामुळे वरील संपत्ती पैकी ईशा आणि आहाना या दोघी देखील सनी आणि बॉबी इतक्याच खऱ्या वारसदार आहेत.