

अभिनेता किरण गायकवाड हे नाव समोर आले की डोळ्यांसामर येतो तो थंड डोक्याने अनेक महिलांना यमसदनी पाठवणारा टेलिव्हिजनवरचा देवमाणूस. अभिनेता किरण गायकवाडने ही भूमिका अगदी प्रभावीपणे साकारली होती. आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामध्येही तो दिसला. या दोन यशस्वी पर्वानंतर आता तिसऱ्या सीझनमध्येही तो प्रेक्षकांच्या पसंतीस येतो आहे. 'देवमाणूस: मधला अध्याय' असे या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे नाव आहे. (Latest Entertainment News)
आपल्या आयुष्यातील आणि करियरमधील प्रत्येक अपडेट तो सोशल मिडियावर शेयर करत असतो. पण नुकत्याच त्याच्या केलेल्या पोस्टने त्याचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. किरणने शेयर केलेल्या पोस्टमध्ये तो सोशल मिडियाला अलविदा करत असल्याचे म्हणत आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘सोशल मिडिया चांगली आहे पण योग्य वेळ वापरत आली तर , माझा खूप वेळ सोशल मीडिया वर जातोय असा लक्षात आला म्हणून जरा काही काळासाठी ( कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्स वरून रजा घेतोय… भेटूया लवकरच' या सोबतच त्याने #socialmediadetox हे हॅशटॅग वापरले आहे.
अर्थात या पोस्टने त्याचे चाहते संभ्रमात पडले आहेत. किरणने अलीकडेच त्याच्या आगामी सिनेमाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. अनेकांनी या सिनेमासाठी किरणने असे पाऊल उचलल्याचे चाहते म्हणत आहेत.