

Dhanashri verma new telegu movie : एकीकडे चहल आणि आरजे महावश यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरत असतानाच एक्स वाइफ धनश्री वर्माचे चाहते 'ती सध्या काय करते' च्या चिंतेने ग्रस्त होते. पण सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत धनश्रीने ती दाक्षिणात्य सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे शेयर केले होते. आता या सिनेमाबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. धनश्री Akasam Daati Vastaava या तेलुगू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
या सिनेमात धनश्रीची व्यक्तिरेखा डान्सच्या आसपास फिरणारी आहे. वारीसु, संक्राथिकी वास्थूनाम, हीट : द फर्स्ट केस या सिनेमाचे निर्माते दिल राजू यांनी या सिनेमाचे निर्माण केला आहे. तर श्री शशीकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दुबईमध्ये जन्म झालेली धनश्री पेशाने डेंटिस्ट आहे. याशिवाय The Dhanashri verma या नावाची तिची कंपनी देखील आहे. तिने "बल्ले नी बल्ले", "लहंगा", "प्यार चाहिए" आणि "ओये होए होए" यांसारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. तसेच या सिनेमात अगदी नवीन स्टार कास्ट असल्याचे समोर येत आहे. अजूनही या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.
चहल आणि आरजे महावश सध्या एकमेकांना सोशल मिडियावर चीयर करताना दिसत आहेत. याशिवाय पंजाब आणि चेन्नईच्या सामन्यात तिने चहलसाठी चीयर करणारी पोस्टही लिहिली होती. यावरून या अफेअरबद्दल लोक अनेक अंदाज बांधले जात आहेत.