

Yahya Bootwala blame on Kesari-2 movie dialogues Stolen from poem
मुंबई :
क्रिएटर आणि यु-ट्युबर याह्या बूटवालाने केसरी २ च्या निर्मात्यांवर त्याच्या कवितेतून डायलॉग्जची चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, याह्याने केसरी २ चित्रपटातील आणि जालियनवालाबाग नावाशी संबंधित त्याच्या संवादाच्या ओळींची तुलना केलीय आणि आणि निर्मात्यांना त्याच्या कामाचे श्रेय देण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ हजारहून अधिक शेअर्स आणि एक हजाराहून अधिक कॉमेंट्स आले आहेत. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये करण जोहर, धर्मा मुव्हीजला टॅग केलं आहे.
याह्याचा दावा आहे की. चित्रपटातील एक डायलॉग त्याची जालियावाला बागवरील कविता, जी पाच वर्षांपूर्वी आली होती, ते चोरी करण्यात आलं आहे. त्याने एक पुरावादेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
याह्याने कविता वाचताना आपला एक व्हिडिओ आणि चित्रपटातील अनन्या पांडेच्या डायलॉग्जचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. याह्याने कविता केलीय त्यामदील ओळी अशा प्रकारे आहेत- 'चलते-चलते मैं एक दीवार के पास पहुंचा, वहां गोलियों के निशान थे। वहां से फुसफुसाने की आवाज आ रही थी।'
याह्याने अनन्याचा जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये अनन्या म्हणते - 'दीवारों के ज्यादा पास जाओ ना, तो फुसफुसाने की आवाजें आती हैं।'
त्यानंतर याह्याच्या कवितेतील पुन्हा ओळी ऐकू येतात-'जब आप चुप हो जाओ और दीवारें बात करती हैं तो मन में एक सवाल उठता है कि दरअसल मरा कौन है?'
तर अनन्याचा डायलॉग ऐकू येतो - 'जब दीवारें बात करती हैं , और आप चुप हो जाओ ना तो मन में क्या सवाल उठता है, ये सवाल उठता है कि दरअसल मरा कौन है?'