

siddharth chaturvedi tripti dimri dhadak 2 release
मुंबई - दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल चित्रपटातून वाहव्वा मिळवाणीर तृप्ती डिमरी नव्या चित्रपटातून भेटीला आलीय. आज १ ऑगस्ट रोजी धडक २ रिलीज झाला आहे. नेटिझन्सनी चित्रपटाच्या स्टोरीसह कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक केले आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला तर काहींनी क्रूर वास्तवाचे चित्रण देखील केले. एक्स अकाऊंटवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिलीय.
२०१८ मध्ये रिलीज झालेला धडक हा सीक्वल आहे. आज १ ऑगस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला.या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा सिद्धांत चतुर्वेदी सोबत तृप्तीने काम केलं आहे. धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत हा चित्रपट सैयाराची बरोबरी करेल, असे म्हटले जात आहे. कारण, १ हजार स्क्रिन्सवर मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटाची १८,००० तिकिटे विकली गेली आहेत.
चेन्नईसारख्या शहरांमध्ये रिलीजपूर्वीच शो जवळजवळ संपले आहेत. अनेक थिएटर पूर्ण संख्येने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. कोलकाता आणि जयपूरमधील थिएटरमध्येही आगाऊ बुकिंगमध्ये सतत वाढ होत आहे.
एका सोशल मीडिया युजरने लिहिलं- 'धडक २' हा तृप्ती डिमरीचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. तो म्हणाला, "#Triptii या चित्रपटात फक्त अभिनय करत नाहीये, तर ती ग्रेसफुल आहे. #Dhadak2 हा तिचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे- कथा सांगण्यात धाडस आणि अभिनयात प्रामाणिकपणा! #Dhadak2 मध्ये दोन्हीही गोष्टींना उधाण आले आहे! कामगिरी, संवाद, भावनिक खोली, सूडाविरुद्धचा राग आणि संदेश!.."
दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा आगामी ॲक्शन चित्रपट 'अर्जुन उस्तारा' मध्ये तृप्ती डिमरी दिसेल. शाहिद कपूर सोबत पहिल्यांदा ती मोठ्या पडद्यावर दिसेल. हा चित्रपट साजिद नाडियाडवालाच्या प्रोडक्शन अंतर्गत चित्रपटाची कहाणी अंडरवर्ल्डवर आधारित आहे.
सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट 'मां बहन' मध्येही ती दिसेल. यामध्ये माधुरी दीक्षितदेखील दिसणार आहे. माधुरी दीक्षित ही तृप्तीच्या आईच्या भूमिकेत असेल. या शिवाय रवी किशन देखील मुख्य भूमिकेत असेल. असं म्हटलं जात आहे की, हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल.
संदीप रेड्डी वांगा यांचे दिग्दर्शन असलेला बिग बजेट चित्रपटातही तृप्ती प्रभास सोबत दिसेल. चित्रपटाचे शूटिंग २०२५ मध्ये सुरू होईल आणि २०२६ मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
ॲनिमल पार्कमध्येही तृप्ती अभिनय साकारणार आहे. ॲनिमल चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पण, वांगा यांनी अद्याप घोषणा केलेली नाही.