Tarak Mehta : ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी गेली ‘ही’ अभिनेत्रीने पण…

kajal pisal-daya ben
kajal pisal-daya ben

पुढारी ऑनलाईन डेस्क : "तारक मेहता का उलटा चश्मा" (Tarak Mehta)  या कॉमेडी मालिकेमध्ये दयाबेनच्या भूमिकेत टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा काजल पिसाळ दिसणार असल्याने तिचे चाहते आनंदीत होते. मात्र ऑडीशन देऊनही तिला रिजेक्ट केल्याने तिच्या चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. (Tarak Mehta)

"तारक मेहता का उलटा चश्मा"  या कॉमेडी मालिकेने काही कालावधीतच लोकप्रियतेचा टप्पा गाठला आहे. या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानीने आपल्या आवाजातून एक वेगळी छाप पाडली होती. काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेमधून दूर राहण्याचं ठरवलं. तिच्या जागी आता दयाबेनच्या भूमिकेत टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा काजल पिसाळ हिची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चेला उधाण होते. चाहत्यांना तिला या भूमिकेमध्ये पाहण्याची इच्छा होती. ती या भूमिकेसाठी ऑडिशनला गेली होती, परंतु निर्मात्यांनी तिला परत बोलावले नाही, असं काजलनेचं  स्वत: स्पष्ट केले आहे.

याबद्दल बोलताना काजल म्हणाली की, मी दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिले होते. मात्र मला ती भूमिका मिळाली नाही. ऑडीशन दिल्यानंतर मी निर्मात्यांच्या फोनची बराच वेळ वाट पाहिली, पण फोन आला नाही. काही प्रॉडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टर्स यांनाही असं वाटलं की, दयाबेनच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनीही मला नव्या प्रोजेक्टसाठी संपर्क केला नाही.

काजल पिसाळ ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा असून तिने कुछ इस तरह , एक हजारों मे मेरी बहना है, उडान आणि नागिन-5 या  मालिकेत काम केले आहे. याबरोबरच अनेक शोमध्ये ती दिसली होती. त्यामुळे दयाबेनच्या भूमिकेत तिला पाहण्याची चाहत्यांची तीव्र इच्छा होती, मात्र या भूमिकेसाठी तिची निवड झाली नसल्याने तिचे चाहतेही नाराज झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news