

Deepika Padukone Hollywood Walk of Fame star
मुंबई - दीपिका पदुकोण केवळ बॉलिवूडमधील सुपरस्टार नाही, तर एक जागतिक स्तरावरील आयकॉन आहे. हॉलीवूड चेंबर ऑफ कॉमर्सकडून तिला प्रतिष्ठित हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर स्टार प्रदान करण्यात आला आहे. हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय कलाकार ठरलीय.
दीपिकाचा हा सन्मान एमिली ब्लंट, टिमोथी चालमेट, रामी मालेक, रॅचेल मॅकअॅडम्स, स्टॅनली टुच्ची, डेमी मूर यांसारख्या आंतरराष्ट्रीय नामवंत कलाकारांसोबत यंदाच्या यादीत त्यांचे नाव घेतले जात आहे.
दीपिकाच्या यशाची यादी दीर्घ आहे. 2018 मध्ये Time Magazine ने तिला जगातील ‘100 Most Influential People’ मध्ये स्थान दिले. त्यानंतर TIME100 Impact Award मिळाला. दीपिका बॉलिवूडमध्येही सक्रिय आहेत. आगामी चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या बॅनरचे प्रोजेक्ट्सही आहेत. लवकरच ती प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांच्या चित्रपटात झळकणार आहे.