delhi crime 2
delhi crime 2

Delhi Crime Season 2 : Netflix ‘दिल्ली क्राईम’ चे पुन्हा शूटिंग होणार?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियाच्या नव्या वेब सीरीजची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. यातलीच एक सीरीज म्हणजे दिल्ली क्राईम. बहुचर्चित वेब सीरीज दिल्ली क्राईमच्या सीझन २ ची (Delhi Crime Season 2) खूप काळापासून चाहत्यांना प्रतीक्षा आहे. चाहते अगदी आतुरतेने नव्या सीझनची वाट पाहत आहेत. (Delhi Crime Season 2)

यादरम्यानच दिल्ली क्राईम-2 बाबत मोठी बातमी समोर आली होती, की Netflix दिल्ली क्राईम -२ च्या काही दृश्यांबाबत समाधानी नाही. ही दृश्ये पुन्हा चित्रीत केली जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'नेटफ्लिक्स'ने दिल्ली क्राईम सीझन – २ च्या काही दृश्यांना पुन्हा चित्रीत करण्याची तयारीही सुरू केली होती. त्याआधी काेराेनामुळे लागू केलेल्‍या लॉकडाऊनमुळे दिल्ली क्राईम – २ च्‍या चित्रीकरणाला उशीर झाला.

यादरम्यान Delhi Crime वेब सीरीजचे अभिनेते राजेश तैलंग यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये फिरतानाचे फोटोजही शेअर केले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये या सीझन २ ची लवकरच ऑन एअर होण्याची उत्सुकताही वाढली आहे.

'दिल्ली क्राईम' ही नेटफ्लिक्सच्या अगदी खास वेब सीरीजपैकी एक आहे. यामुळेच ओटीटी प्लेटफॉर्म कुठलाच धोका पत्करायला तयार नाही. सावधगिरीचा भाग म्हणून निर्मात्यांनी काही दृश्यं दुसऱ्यांदा शूट करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात नेटफ्लिक्स आणि निर्मात्यांकडून अधिकृतपणे कसलीच घोषणा झालेली नाही. वेब सीरीज दिल्ली क्राइममध्ये राजेश तैलंगसोबत शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन असे कलावंत मुख्य भूमिकेत होते. 'दिल्ली क्राईम'१ २०१२ मध्ये झालेल्या निर्भया केसवर आधारित होती. या सीरीजनं जगभरातून वाहव्वा मिळवली होती.

२०२० साली या सिरीजला आंतरराष्ट्रीय एमी ॲवॉर्डनेही गौरवण्यात आले. यात दिल्ली क्राईमला बेस्ट ड्रामा सीरीजचा पुरस्कार मिळाला होता. ही आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारी भारतातली पहिली वेब सीरीज ठरली. या सीरीजचे लेखन आणि दिग्दर्शन ऋची मेहता यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news