

सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह हुंदईच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीपिका आणि शाहरुख या कंपनीचे ब्रॅंड अॅम्बेसिडर आहेत.
गाडीतील असलेल्या दोषांबाबत फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या दोघांनावर राजस्थानमधील भरतपुरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कीर्ती सिंह असे या तक्रारदाराचे नाव आहे. तेथील रहिवाश्याने हा गुन्हा दाखल केला आहे. त्याने दावा केला आहे की 2022 मध्ये घेतलेल्या हुंदई अल्काझारमध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्याने पुढे अंसा आरोप केला की अनेकदा कंपनीशी संपर्क साधूनही काही उपयोग नाही. त्यांनी त्यांची कार 23 लाखांहून अधिक किमतीत खरेदी केली होती.
सुरुवातीला पोलिसांनी ही तक्रार घेतली नाही. त्यानंतर कीर्ती सिंग यांनी न्यायालयात ही तक्रार दाखल केली. न्यायलयाच्या आदेशानुसार मथुरा गेट पोलिस चौकीत ही तक्रार दाखल झाली आहे. यानुसार भारतीय दंड संहितेनुसार 420, 406 आणि 120बी सोबत भारतीय दंड संहितेनुसार 312, 318, 316, 61 और 175(3) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करत असल्याच्या कारणावरून शाहरुख आणि दीपिका सहआरोपी बनवले गेले आहे. एका दोषी प्रॉडक्टच्या ब्रॅंडचा चेहरा बनल्याप्रकरणी आणि प्रॉडक्टची चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी त्यांनी शाहरुख आणि दीपिकाला दोषी ठरवले आहे.
अर्थात दीपिका आणि शाहरुखच्या टीमने याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.
शाहरुख आगामी किंगमध्ये दिसतो आहे ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या सिनेमात तो पाहिल्यांदाच लेक सुहानासोबत दिसणार आहे. या सिनेमात बरेच कलाकार दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय दीपिकाचा आगामी सिनेमा एक सायफाय अॅक्शन आहे. ज्यात ती अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.