

अभिनेत्री नेहा धूपिया सध्या तिच्या सोशल मीडिया कॅम्पेनमुळे चर्चेत आहे. ब्रेस्टफीडिंग संदर्भात जनजागृती करण्यासाठी फ्रीडम टू फीड या कॅम्पेनच्या माध्यमातून ती सतत सक्रिय असते. आताही तिने काही आठवणी या दरम्यान शेअर केल्या आहेत. नेहा म्हणते की, 'लग्नाआधी गर्भवती होते म्हणून अजूनही तिला ट्रोल केले जाते.’ पुढे ती गंमतीने म्हणते की या गोष्टीने तिला निना गुप्ता आणि आलिया भटच्या यादीत नेऊन बसवले आहे. (Latets Entertainemt News)
नेहाने 2018 च्या मे महिन्यात अंगद बेदीसोबत लग्न केले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना नेहाने हा खुलासा केला आहे. नेहा म्हणते, अंगदसोबतच्या लग्नापूर्वी ती गरोदर असल्याने तिला तेव्हाही आणि अजूनही द्वेषाचा सामना करावा लागला होता.
नेहा म्हणते, ‘ मी अंगदसोबत लग्न केले आणि आणि सहा महिन्यांनी माझी मुलगी मेहरचा जन्म झाला. पण आमच्या लग्नादरम्यान सगळ्यात मोठी चर्चा हीच होती की सहा महिन्यात हिला बाळ कसे काय झाले?
आज मी त्या अभिनेत्रींच्या बाबत बघते की ज्या लग्नाआधीच गरोदर होतात. त्यातल्या त्यात मी निना गुप्ता आणि आलिया भटच्या यादीत आहे. हे मजेशीर आहे. पण खरे सांगायचे तर गर्भावस्था हा एक सुंदर अनुभव आहे.’
नेहा पुढे म्हणते, या टीकेने मला फ्रीडम टू फीडची सुरुवात करण्यासाठी प्रेरित केले. ‘तिच्या मते, महिलांना होणारा त्रास किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावर बोलणे महत्त्वाचे होते. यातूनच मला फ्रीडम टू फीडची संकल्पना सुचली. या माध्यमातून मी चौकटी तोडू इच्छिते आणि सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की या प्रवासात त्या एकट्या नाहीत.
नेहा म्हणते मी जेव्हा माझ्या घरच्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी सांगितले की ठीक आहे, पण आमचे मत बदलण्याआधी तुमच्याजवळ 72 तास आहेत. चला लग्न करूया. मला जवळपास अडीच दिवस दिले होते. त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो आणि लग्न केले. आमचे लग्न एक फार ग्लॅमरस नव्हते.