

प्रदर्शनापूर्वीच ‘ओ’रोमियो’ चित्रपट वादात अडकला असून हुसेन उस्तरा यांच्या मुलीने न्यायालयात धाव घेत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या कायदेशीर कारवाईमुळे चित्रपटाच्या रिलीजवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Hussain Ustara’s daughter files lawsuit against O Romeo
ओ'रोमियो हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गंभीर कायदेशीर वादात अडकला आहे. हुसेन उस्त्रा यांची मुलगी सनोबर शेख हिने निर्माता साजिद नाडियाडवाला, दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि लेखक हुसेन झैदी यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.
हुसेन उस्तारा यांची कन्या सनोबर शेख यांनी सोमवारी शाहिद कपूर स्टारर आगामी चित्रपट 'ओ रोमियो'चे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली. मुंबईतील दिवाणी न्यायालयात खटला दाखल करताना सनोबरने दावा केला की, हा चित्रपट तिच्या दिवंगत वडिलांवरील एक 'अनधिकृत' बायोपिक आहे आणि त्यात त्यांच्या जीवनाचे 'चुकीचे' चित्रण केले आहे. कुटुंबाची परवानगी न घेता हुसेन उस्तरा यांचे असोग्य चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
"ओ'रोमियो" चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच वाद सुरू झाला. सनोबर शेखने आरोप केला की, हा चित्रपट तिचे वडील हुसेन उस्तरा यांच्या जीवनापासून प्रेरित आहे, परंतु कुटुंबाकडून कोणतीही परवानगी वा संमती घेण्यात आली नाही. यानंतर, तिच्या वकिलाने साजिद नाडियाडवाला आणि विशाल भारद्वाज यांना कायदेशीर नोटीस पाठवल्या.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी
१३ फेब्रुवारी २०२६ ओ रोमिओ रिलीज होतोत. सनोबरने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे, निर्मात्यांना १३ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यानंतर ओ'रोमियोला त्याच्या सध्याच्या नावाने किंवा इतर कोणत्याही नावाने प्रदर्शित करण्यास, प्रसारित करण्यास मनाई करावी.
हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित ह्या चित्रपटात शाहिद कपूर भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच सनोबरने दावा केला की, तिच्या पूर्वपरवानगीशिवाय 'व्यावसायिक आणि आर्थिक फायद्याच्या उद्देशाने' 'ओ रोमियो' चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. शिवाय, थिएटर, टीव्ही आणि ओटीटी सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची विनंती केलीय.
निर्मात्यांचे स्पष्टीकरण
जेव्हा निर्मात्यांना नोटिसी पाठवण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की, हा बायोपिक नाही. शिवाय हुसेन उस्तराच्या जीवनावर आधारित चित्रपट नाही. त्यांच्या मते, हा चित्रपट लेखक हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका प्रकरणातून घेण्यात आले सअसून आवश्यक अधिकार मिळवले आहेत.