Genelia Riteish Deshmukh Anniversary| 'तुझे मेरी कसम'पासूनचा प्रवास लग्नापर्यंत येऊन थांबला, जेनेलिया-रितेशचा वेडिंग अल्बम व्हायरल

Genelia Riteish Deshmukh Anniversary| आजही तितकेच प्रेमात! जेनेलिया-रितेशच्या लग्नाचे खास फोटो पुन्हा चर्चेत
image of Genelia Riteish Deshmukh
Genelia Riteish Deshmukh Anniversary album viral instagram
Published on
Updated on
Summary

‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून सुरू झालेली जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची प्रेमकहाणी आज त्यांच्या सुखी संसारापर्यंत येऊन पोहोचली आहे. अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त त्यांच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही जोडी आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Genelia Riteish Deshmukh wedding Anniversary album

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोड्यांपैकी एक असलेली जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांची प्रेमकहाणी आजही चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. ‘तुझे मेरी कसम’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून या दोघांची ओळख झाली आणि तेव्हाच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. सुरुवातीला केवळ चांगली मैत्री असलेलं हे नातं हळूहळू प्रेमात बदललं.

दीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर जेनेलिया आणि रितेश यांनी २०१२ साली विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेलं त्यांचं लग्न आजही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर विवाहांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ आजही चाहत्यांच्या खास आठवणींमध्ये आहेत.

जेनेलिया देशमुखने आज ३ जानेवारी रोजी लग्नाच्या वाढदिवसादिवशी खास फोटो शेअर केले आहेत. तुझे मेरी कसम या चित्रपटापासून त्यांचा झालेला प्रवास विवाहपर्यंत पोहोचला. आजही त्यांच्यात तितकेच प्रेम कायम आहे.

जेनेलियाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं- ''माझा जोडीदार, मी तुझ्यावर प्रेम करते - आज, उद्या - आणि कायम. या सुंदर जीवनकथेतील तू नेहमीच माझा आवडता अध्याय राहशील, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.''

जेनेलियानला पहिल्या भेटीत रितेश वाटला होता उद्धट

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची पहिली भेट हैदराबाद विमानतळावर झाली होती. त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जेनेलियाला असे वाटले होते की, मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेश उद्धट आणि बिघडलेला असेल. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलायचा देखील प्रयत्न केला नव्हता.

सेटवर भेट आणि मैत्री

"तुझे मेरी कसम" चित्रपटाच्या सेटवर जेव्हा दोघे पुन्हा भेटले तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकमेकांसबोत बोलू लागले. चित्रपटाचे शूटिंग सपंल्यानंतर रितेश मुंबईत परतला. तेव्हा त्याला जाणवले की, त्याला जेनेलियाची खूप आठवण येतेय. त्याने तिला फोन लावला आणि सांगितले. जेनेलियाला देखील तसेच वाटले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. त्यांनी "मस्ती" चित्रपटातही एकत्र काम केले.

लग्नानंतरही या जोडीने आपली मैत्री आणि प्रेम कायम जपलं आहे. सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणारे पोस्ट, कुटुंबासोबतचे क्षण आणि त्यांच्या मुलांसोबतचे गोड फोटो नेहमीच चर्चेत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news