
Amruta Subhash movie Chidiya Trailer released
मुंबई - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला "चिडिया" हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलाय. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात विनय पाठक, अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे.
मुंबईतील चाळीतील घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. केवळ कल्पनाशक्ती, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.
दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणाले, 'चिडिया' हे बालपणाला लिहिलेल प्रेमपत्र आहे. हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहण्याविषयी आहे. आपल्या आशा-आकांक्षा कधीही जुन्या होत नाही याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो.