
Hera Pheri 3 Akshay Kumar-Paresh Rawal clash
मुंबई - हेरा फेरी फेम अभिनेते परेश रावल यांनी हेरा फेरी 3 मधून बाहेर पडल्याचे सांगितले होत. त्यांनी क्रिएटिव्ह डिफ्रेंसच्या अफवा नाकारल्या होत्या. आता परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलीय. हेरा फेरी ३ च्या निर्मात्यांनी ही ॲक्शन घेतल्याचे म्हटले जात आहे.
परेश रावल यांनी हेरा फेरी ३ मध्ये काम करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर फॅन्सनी निराशा व्यक्त केली होती. वेगळ्या कारणामुळे परेश रावल हा चित्रपट करत नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.
आता परेश रावल यांच्या विरोधात निर्मात्यांनी अनप्रोफेशनल बिहेवियर साठी लीगल नोटीस पाठवली आहे. एका वेबसाईटनुसार, हेरा फेरीचे निर्माते केप ऑफ गुड फिल्म्सने अनप्रोफेशनल बिहेवियरसाठी रावल यांना २५ कोटींची नोटीस दिलीय. केप ऑफ गुड फिल्म्सचा मालक अक्षय कुमार आहे.
रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी स्केटहोल्डर्सकडून हेरा फेरीचे राईट्स खरेदी केले होते. चित्रपटावर जे कर्ज होतं , तेदेखील फेडलं. खर्च केलेली रक्कम कोटींमध्ये होती. २० वर्षांनंतरही हेरा फेरी प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर आणणे, असा या मागील उद्देश होता. परंतु, परेश यांच्या अनप्रोफेशनल बिहेवियरमुळे चित्रपटाला मोठे नुकसान झाले.
२००० मध्ये कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी चित्रपट आणला होता. त्यामध्ये राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनील शेट्टी) आणि बाबू राव (परेश रावल) यांनी धुमाकूळ घातला होता. हेराफेरी चित्रपट यशस्वी झाला. पुढे त्याचा सिक्वेल हेरा फेरी २००६ मध्ये आला आणि त्यालाही खूप यश मिळाले.