
War 2 Teaser out now
मुंबई : बहुप्रतीक्षित चित्रपट वॉर 2 चा टीझर अखेर रिलीज झाला आहे. पडद्यावर सुपरस्टार- हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोन नायकांमधील युद्ध पाहायला मिळेल. निर्मात्यांनी फॅन्सना सरप्राईज देत शानदार टीझर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर टीझर धुमाकूळ घालत आहे.
यशराज स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ मध्ये एनटीआरची धमाकेदार ॲक्शन पाहायला फॅन्स फार उत्सुक आहेत. निर्मात्यांनी टीझरमध्ये नवे ॲक्शन सीक्वेंस आणि सस्पेंस जोडलं आहे. विशेष म्हणजे, निर्मात्यांनी टीझर रिलीजसाठी एनटीआरच्या वाढदिवसाचे औचित्य साधले आहे.
टीझरची सुरुवात एनटीआरच्या पॉवर पॅक आवाजाने होते. यामध्ये तो कबीर (हृतिक रोशन) ला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. आणि त्याला आव्हान देतो एनटीआर म्हणतो, कबीर भारताचा सर्वात चांगला सैनिक आणि रॉचा सर्वात चांगला एजेंट आहे. तो म्हणतो की, कबीरच्या हालचालींवर त्याची बारीक नजर आहे. एनटीआर म्हणतो- 'तू मला ओळखत नाहीस, पण तू मला लवकरच ओळखशील'.
टीझरमध्ये कियारा आडवाणीच्या बोल्ड लूकची झलक दिसते. कियारा गोल्डन कलर मोनोकिनीमध्ये दिसते. हृतिक -कियारा यांच्यातील रोमान्स सीन्स देखील पाहायला मिळत आहे.