

मराठी कलाकारांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची स्तुती केली. सुरज चव्हाण, स्वप्नील जोशी यांसह अनेकांनी त्यांच्या सहकार्याच्या, नेतृत्वाच्या आणि माणुसकीच्या क्षणांचा उलगडा केला.
Celebrity Reaction on Ajit Pawar Death
सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी अजित पवार यांच्या आठवणी जिवंत करत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. “मित्रांनो माझा देव चोरला आज…” असे सुरज चव्हाणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अजित पवार यांच्यासोबतच्या खास क्षणांची आठवण जागवली. अभिनेता स्वप्नील जोशीनेही आपल्या पोस्टमध्ये अजितदादांच्या सहकार्याच्या, नेतृत्वाच्या आणि माणुसकीच्या क्षणांचे सुंदर वर्णन केले. याशिवाय, अनेक कलाकारांनीही त्यांच्या पोस्टद्वारे अजित पवारांच्या वैयक्तिक आणि राजकीय गुणांचे गौरव केले. त्यांच्या कामाची शैली, सहकार्य, वर्तन, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील आपल्या कारर्दीचा गौरव देखील कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.
मित्रांनो माझा देव चोरला आज... सूरज चव्हाण
बिग बॉस मराठी विनर सुरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की, अजित दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. एका गरीब मुलाच्या आयुष्यात अजित दादांनी देवासारखी भूमिका बजावली, स्वतःचे घर बांधून दिले, काळजी घेतली आणि नवे आयुष्य दिले. आई-वडिलांनंतर अजित दादांनीच आपल्यासाठी सर्वाधिक केले असल्याचे सांगत, त्यांची आठवण आयुष्यभर हृदयात जपण्याचा निर्धार सूरजने व्यक्त केला. शेवटी त्याने महटलंय-'दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचाच सूरज.'
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व - सुबोध भावे
अभिनेता सुबोध भावे म्हणाला, 'महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक विलक्षण नेतृत्व होते. त्यांच्या काम करण्याच्या शैलीचे, हजरजबाबीपणाचे आणि सर्वसामान्य माणसाशी थेट, त्याच्या भाषेत संवाद साधण्याच्या गुणांचे कौतुक आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर असलेले त्यांचे बारकाईने लक्ष आणि माणुसकीची जाण कायम आठवणीत राहील. अजित दादांची उणीव नेहमी भासत राहील आणि त्यांच्याशी झालेल्या भेटी आयुष्यभर स्मरणात राहतील.'
आज घरातलं कुणीतरी गेलं असं वाटतय- सायली संजीव
'माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार-महाराष्ट्राचे हक्काचे दादा.. तुमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण राहील. तुमचं असं जाणं मनाला चटका लावून गेलं. आज घरातलं कुणीतरी गेलं असं वाटतय..आम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हे स्वीकारण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या बरोबर ह्या अपघातात जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली'
अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले - संकर्षण कऱ्हाडे
पक्ष, पद किंवा राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन अजित दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक आधार वाटणारे व्यक्तिमत्त्व होते, असे संकर्षण कऱ्हाडे म्हणाला. त्यांच्या जाण्याने घरातील एखादी जवळची व्यक्ती गेल्यासारखी पोकळी निर्माण झाली आहे. गंभीर प्रश्नांवरही मिश्किल शैलीत उत्तर देत पत्रकार परिषदेला संवादाचे स्वरूप देण्याची त्यांची खास लकब कमालीची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे असंख्य कार्यकर्ते आज पोरके झाल्याची वेदनाही त्याने आपल्या पोस्टमध्ये मांडली आहे. तसेच, अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करत, अजित दादा कायम आठवणीत राहतील, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
काम करण्याची तुमची तळमळ, मनाला भिडणारी - स्वप्नील जोशी
एक होता दादा-दिपाली सय्यद
''महाराष्ट्राच्या धुरंदर नेत्याला… राज्याचा उपमुख्यमंत्री, कणखर आवाज असणाऱ्या…
सर्वांचे लाडके सन्माननीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली''
माणूस घराच्या बाहेर जातो आणि तो परत येईलच याची शाश्वती नाही - अजिंक्य देव
आज २८ जानेवारी २०२६ याची सुरुवातच फार वाईट झाली आहे. आपले अजित दादांचे विमान दुर्घटनेत दु:खद निधन झाले. विश्वास बसत नाहीये या गोष्टींवर..हे खूप अनाकलनीय आहे हे..ते खूप लवकर गले..बाहेरून कडक आणि आतून नारळाच्या मलईसारखा माणूस...पवार कुटुंबीयांचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत...यातून एक शिकण्यासारखे आहे ते म्हणजे-'माणूस घराच्या बाहेर जातो आणि तो परत येईलच याची शाश्वती नाहीये..'