

Hrithik Roshan-Junior NTR vs Rajinikanth
मुंबई - स्वातंत्र्य दिनी खास निमित्ताने चित्रपटगृहात दोन मोठे ॲक्शन चित्रपट येत आहे. दोन्ही चित्रपटांनी टक्कर पाहायला मिळेल. एकीकडे साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ तर दुसरीकडे ऋतिक रोशन. टॉलीवुडचा स्टार ज्यु. एनटीआर ऋतिक रोशनसोबत ‘वॉर २’ मध्ये दिसले. हे चित्रपट १४ ऑगस्ट रोजी आमने-सामने येणार आहेत. पण रिलीजच्या आधी जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम ॲडव्हान्स बुकिंगवर पाहायला मिळत आहे. दुसरीकेड रजनीकांत यांचा चित्रपट कुली देखील मागे नाही. त्याची अमाप चर्चा होताना दिसतेय. जाणून घेऊया या चित्रपटांबद्दलच्या अपडेट्स.
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ मध्ये ऋतिक रोशन सोबत ज्युनियर एनटीआर, कियारा आडवाणी यांची जोडी दिसेल. पण दुसरीकडे कुली मुळे कमाई आकडे हलताना दिसत आहेत. वॉर २ हा सिद्धार्थ आनंदच्या २०१९ च्या ब्लॉकबस्टर 'वॉर'चा सिक्वेल आहे.
वॉर २ हा आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी 'वायआरएफ स्पाय युनिव्हर्स'चा पुढचा भाग आहे, ज्यामध्ये टायगर फ्रँचायझी, पठाण आणि वॉर सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. त्याचा पुढचा भाग अल्फा आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी आहेत, जो या ख्रिसमसमध्ये २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्स आधीच मोहित सुरीच्या रोमँटिक ड्रामा 'सैयारा' या जागतिक बॉक्स ऑफिस यशाचा फायदा घेत आहे.
दरम्यान, कुली बझ मुळे वॉर २ च्या तिकिट बुकिंगवर परिणाम होऊ शकतो.
लोकेश कनगराज यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘कुली’चा ट्रेलर चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये रजनीकांत शिवाय नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहिर, आमिर खान हे सुपरस्टार्स दिसणार आहेत. तिकिट बुकिंग बद्दल सांगायचे झाले तर रिपोर्टनुसार, हा चित्रपट अमेरिकेतील ४३० ठिकाणी ११४७ शोसह प्रदर्शित होत आहे. ‘कुली’ प्रीमियर स्क्रीनिंगसाठी जवळपास ८.७२ कोटी रुपयांचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. अमेरिकेत त्याची आधीच ३५,००० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.