Border 2-O Romeo BO collection : २७ दिवस 'बॉर्डर-२' ची भरभरून कमाई; 'ओ रोमियो'ला कसा प्रतिसाद?

Border 2 BO collection : २७ दिवस बॉर्डर २ची भरभरून कमाई; ओ रोमियोला कसा प्रतिसाद?
image of Border 2-o romeo film poster
Border 2-o romeo Box Office collection instagram
Published on
Updated on
Summary

‘बॉर्डर २’ने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार पकड ठेवली असून २७ दिवसांनंतरही चित्रपटाची कमाई स्थिर आहे. देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे ‘ओ रोमियो’ या रोमँटिक चित्रपटाने तरुण प्रेक्षकांना आकर्षित केलं असलं, तरी कमाईच्या बाबतीत ‘बॉर्डर 2’चा दबदबा कायम असल्याचं चित्र आहे.

Border 2 BO Day 27- o romeo collection

सनी देओलचा वॉर ड्रामा बॉर्डर २ चित्रपटगृहात रिलीज होऊन चौथा आठवडा झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. एकूण कलेक्शनमध्ये देखील फायदा झाला आहे.

‘बॉर्डर २’ हा २३ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. अनुराग सिंह दिग्दर्शित चित्रपटाने रिलीजच्या २७ व्या दिवशी किती कलेक्शन केलं आहे? ‘बॉर्डर २’ मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत.

image of Border 2-o romeo film poster
Bigg Boss Marathi 6| राखीला घराबाहेर काढलं म्हणून काही जण हसले, पण बनली 'उत्तराधिकारी'! 'आता राडाच..'

आता रिलीज झालेला शाहिद कपूरचा नवा चित्रपट ओ रोमियो पुढे देखील बॉर्डर २ ची कमाई कायम आहे. ‘बॉर्डर २’ ने पहिल्या आठवड्यात २२४.२५ कोटी कमावले होते. दुसऱ्या आठवड्यात ७०.१५ कोटी कमावले. तिसऱ्या आठवड्यात २३.३५ कोटी कमावले.

२२ व्या दिवशी चित्रपट ८० लाख रुपये

२३ व्या दिवशी १.९ कोटी रुपये

२४ व्या दिवशी १.४ कोटी रुपये

२५ व्या दिवशी ६० लाख रुपये

२६ व्या दिवशी ८० लाख रुपये

रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर २’ने रिलीजच्या २७ व्या दिवशी ५५ लाख रुपयांची कमाई केलीय. एकूण कमाई ३२३.८० कोटी रुपये झाली आहे.

'ओ रोमियो'च्या कमाईत घसरण

ओ रोमियो मोठ्या पडद्यावर रिलीज होऊन ६ दिवस पूर्ण झाले आहेत. रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या ओ रोमियोने बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी ३.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एकूण कलेक्शन ४३.८५ कोटी रुपये कमावले आहेत.

image of Border 2-o romeo film poster
Salim Khan Health Update | 'सलीम खान यांची प्रकृती ठिक', डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट; सोमी अलीची हृदयस्पर्शी पोस्ट समोर

चित्रपटातील कलाकार

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ओ रोमियोमध्ये शाहिद कपूर, तमन्ना भाटिया, तृप्ती डिमरी, फरीदा जलाल, दिशा पटानी, नाना पाटेकर यांच्या भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news