Bigg Boss Marathi 6| राखीला घराबाहेर काढलं म्हणून काही जण हसले, पण बनली 'उत्तराधिकारी'! 'आता राडाच..'

Bigg Boss Marathi | मोठा ट्विस्ट; राखीचा खेळ पलटला!
rakhi sawant
Bigg Boss Marathi 6 updates instagram
Published on
Updated on
Summary

Bigg Boss Marathi च्या ताज्या भागात राखीला घराबाहेर काढल्याची घोषणा होताच स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला. मात्र लगेचच तिला ‘उत्तराधिकारी’ घोषित करण्यात आलं आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचे भाव बदलले. या अनपेक्षित ट्विस्टमुळे घरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi 6 rakhi sawant new game start in the house

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. ताज्या भागात राखीला बाऊन्सर्स घराबाहेर काढत असल्याचे दिसले होते. ही घोषणा होताच घरातील काही स्पर्धकांनी आनंद व्यक्त करत सुटकेचा निश्वास टाकला होता. काही जण तर हसले होते.

मात्र काही क्षणांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. बिग बॉसने नवा ट्विस्ट देत राखीला ‘उत्तराधिकारी’ घोषित केले. या घोषणेनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. ज्या स्पर्धकांनी तिच्या जाण्याचा आनंद साजरा केला होता, तेच आता चिंतेत पडले. कारण ‘उत्तराधिकारी’ या भूमिकेमुळे राखीला काही विशेष अधिकार मिळणार, असा अंदाज आहे.

rakhi sawant
Salim Khan Health Update | 'सलीम खान यांची प्रकृती ठिक', डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट; सोमी अलीची हृदयस्पर्शी पोस्ट समोर

या निर्णयामुळे घरात वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर या एपिसोडची जोरदार चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी या ट्विस्टचं स्वागत केलं. जेव्हा बाऊन्सर्स राखील घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा नेटकऱ्यांनी राखी घरात हवी, त्याशिवाय काही मजा नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

आता मात्र ती बिग बॉसच्या घरची उत्तराधिकारी बनलीय. ही गोषणा करम्यासाठी विनोदवीर सागर कारंडेला बिग बॉसने बोलावलं आणि तिला उत्तराधिकारीचा मुकूट परिधान करायला सांगितलं. तिच्या नावाचा जयघोष देखील घरात झाला. राखी उत्तराधिकारी बनल्यानंतर राखी सावंत आता राडाच करणार.. असे कॉमेंट्स नेटकरी देत आहेत.

rakhi sawant
Girish Oak-Mukta Barve Maya Trailer - 'एक पेशंट..उद्धट, दारुडा, तिरसट माणूस..' खोल भावनांमध्ये रुजणारा 'माया'चा ट्रेलर लॉन्च

या सगळ्या घडामोडींमुळे पुढील भागात काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. राखी ‘उत्तराधिकारी’ म्हणून कोणते निर्णय घेणार? तिच्याविरोधात घरातील इतर स्पर्धक एकत्र येणार का? आता पुढील भागात आणखी कोणता धमाका होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news