Dharmendra hospitalized: अभिनेते धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल; समोर आली मोठी अपडेट

धर्मेंद्र यांना घाईघाईत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्यांचे फॅन चिंतित आहेत
Entertainment
Dharmendra shares latest health updatePudhari
Published on
Updated on

दिग्गज अभिनेते यांना धर्मेंद्र श्वास घेण्यास त्रास झाल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी विकी लालवाणी यांनी सोशल मीडिया हँडलवरुन ही पोस्ट शेयर केली आहे. धर्मेंद्र यांना घाईघाईत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्यांचे फॅन चिंतित आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत सनी आणि बॉबी हे दोघेही असल्याचे समोर येत आहे. सुरुवातीला या घटनेला एक रुटीन चेक अप असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र कारण श्वास घेण्यास त्रास असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Entertainment News)

नेमके काय घडले?

विकीने सांगितले की धर्मेंद्र यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये भरती केले गेले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Entertainment
Marathi Celebrity Divorce: मराठी मालिकाविश्वात चाललं आहे तरी काय? या कलाकारांच्या संसारात मिठाचा खडा

हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यानेही सांगितली परिस्थिति

हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यानेही सांगितले की धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या बॉडीचे बेसिक पॅरामीटर योग्यप्रकारे काम करत आहेत. त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी होत असते. त्यामुळे चाहत्यांनी चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले.

Entertainment
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या सोशल मीडिया स्टोरीने चाहते चक्रावले; वीण दोघांतली.. मालिका सोडणार?

धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा चर्चेत

धर्मेंद्र आगामी श्रीराम राघवन यांचा युद्धपट इक्कीसमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा डिसेंबर 2025 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात जयदीप अहलावत, अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news