

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली तुटेना मालिकेत दिसते आहे. या मालिकेतील तिच्या स्वानंदी या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतानाही दिसत आहेत. या मालिकेत सध्या स्वानंदीच्या लग्नाचा प्लॉट सुरू आहे. हे सगळे सुरू असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या सोशल मीडिया स्टोरीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Entertainment News)
तिने एक व्हीडियो शेयर केला आहे. ज्यामध्ये ती आणि एक व्यक्ति दिसते आहे ज्यात ती कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. ती व्यक्ती तिला सीन समजावून सांगत असल्याचे दिसत आहे. या व्हीडियोवर तिने नवीन वेबसिरीज आणि नवीन काम असे इंग्रजीमधील हॅशटॅग दिले आहेत. त्यामुळे आता तेजश्री मालिकेनंतर एका नव्या वेबसिरिजमध्ये दिसणार असल्याचेही समोर आले आहे.
ही वेबसिरिज कुठल्या भाषेत येणार? किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मवर दिसणार याबाबत काहीच समोर आलेले नाही. तसेच या सिरिजसाठी ती वीण दोघातलीला राम राम ठोकणार का? हे देखील अजून समोर आलेले नाही.
तेजश्री प्रधानने आतापर्यंत होणार सून मी या घरची, प्रेमाची गोष्ट, अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम केले आहे. तर ‘ती सध्या काय करते’, ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या सिनेमातही दिसली आहे. याशिवाय बबलू बॅचलर या सिनेमात तिने अभिनेता शर्मन जोशी यासोबत काम केले आहे.