Rashmika Mandanna Injury : रश्मिका मंदानाला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, चाहते चिंतेत, डॉक्टर म्हणाले, हे तर..

‘माइसा’ आणि ‘रानाबाली’ या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान रश्मिकाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
bollywood news
Rashmika Mandanna Injury : रश्मिका मंदानाला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, चाहते चिंतेत, डॉक्टर म्हणाले, हे तर..file photo
Published on
Updated on

bollywood rashmika mandanna suffers serious hip injury shoot ranabaali mysaa doctors advise 6 weeks rest

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री रश्मिका मंदानाला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, तब्बल ६ आठवडे बेड रेस्ट करण्यास सांगितले आहे. रश्मिकाच्या प्रकृतीसाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

bollywood news
Kangana Ranaut: कंगना रणौतने मोदींसारखा सेल्फी व्हिडिओ केला पोस्ट; 'त्या' वक्तव्याचे केले समर्थन; सोशल मीडियावर Video Viral

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या आगामी ‘माइसा’ आणि ‘रानाबाली’ या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान रश्मिकाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या हिपला (कंबरेच्या भागाला) गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

रश्मिकाला तिच्या दोन्ही प्रोजेक्ट्सच्या शूटिंगदरम्यान करण्यात आलेल्या तीव्र अॅक्शन आणि डान्स सीक्वेन्समध्ये ही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

रश्मिका मंदानाला नेमकी कोणती दुखापत झाली?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुखापतीमुळे तिच्या हिपमधील टेंडन पूर्णपणे वेगळे झाले आहे. डॉक्टरांनी ही दुखापत गंभीर असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारच्या दुखापती साधारणपणे तीव्र शारीरिक प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतात. अभिनेत्रीला अशा प्रकारची दुखापत झाल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याचे सांगितले जात आहे.

bollywood news
Jana Nayagan Box Office Collection Day 5: ‘जन नायकन’च्या कमाईत घट, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई?

रश्मिकाला ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला

डॉक्टरांनी रश्मिकाची दुखापत गंभीर असल्याचे सांगत तिला ६ आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारच्या दुखापती सामान्यतः कठोर शारीरिक प्रशिक्षण घेणाऱ्या अॅथलीट्समध्ये आढळतात.

रश्मिकाचा ‘रानाबाली’ चित्रपट

‘रानाबाली’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल संक्रित्यायन करत आहेत. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या काळातील १८५४ ते १८७८ या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही एका महान योद्ध्याची कथा आहे. दमन आणि अस्तित्वाच्या संघर्षाच्या काळात आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी हा योद्धा पुढे येतो.

या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. मैत्री मूव्ही मेकर्सने टी-सीरीजसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा हा एकत्रितपणे तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि आता तिसऱ्यांदा त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

यापूर्वी दोघांनी त्यांच्या लग्नादरम्यान चाहत्यांना खास भेट देत चित्रपटातील एक गाणे रिलीज केले होते. या गाण्याला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

रश्मिकाचा ‘माइसा’ चित्रपट

‘माइसा’ हा एक पॅन इंडिया पीरियड अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले करत आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानाचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि दमदार अवतार पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news