Bollywood : यो-यो हनी सिंह चित्रांगदाबाबत हे काय भलतंच बोलून गेला.. 'तर सगळ्या गर्लफ्रेंड्सना सोडीन'

चित्रांगदाच्या मुलालाही सांभाळण्याची दर्शवली होती तयारी, पतीबद्दल म्हणाला..
Bollywood
Bollywood : यो-यो हनी सिंह चित्रांगदाबाबत हे काय भलतंच बोलून गेला.. 'तर सगळ्या गर्लफ्रेंड्सना सोडीन'file photo
Published on: 
Updated on: 

bollywood news honey singh wants to adopt chitrangada singh son will leave girlfriends old video viral

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह यांच्याबद्दल हनी सिंहची असलेली आवड कोणापासूनही लपलेली नाही. तब्बल १३ वर्षांपूर्वी हनी सिंहने या अभिनेत्रीबद्दल असे काही वक्तव्य केले होते, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

Bollywood
Bollywood : दीपिका पदुकोणला वारंवार झाडू मारायला लावल्याने तीच्या डोळ्यात पाणी आले, घरकामवाली बनवले, अनुपम खेर म्हणाले..

यो यो हनी सिंहच्या गाण्यांचे चाहते जगभरात आहेत. हनी सिंहचे गाणे वाजताच पार्टीचे वातावरण तयार होते आणि प्रत्येकजण थिरकायला लागतो. हनी सिंह जितका आपल्या संगीताबाबत स्पष्ट आहे, तितकेच तो नातेसंबंधांबाबतही स्पष्टपणे बोलतो. चित्रांगदा सिंह त्‍याला खूप आवडतात, असे त्‍याने अनेकदा सांगितले आहे. सध्या चित्रांगदा यांच्याबद्दल दिलेल्या त्यांच्या एका जुन्या मुलाखतीचीही चर्चा रंगली आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्रीला मिळवण्यासाठी आपल्या सर्व गर्लफ्रेंड्सना सोडण्याची तयारी दर्शवली होती.

हनी सिंहला आवडते चित्रांगदा

२०१३ मध्ये हनी सिंहने 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदा सिंह यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तो म्हणाला होता की, माझ्या ५६२ गर्लफ्रेंड्स आहेत; पण मला चित्रांगदा सिंह मिळाल्या, तर मी त्या सर्वांना एका दिवसात सोडून देऊ शकतो. चित्रांगदा या पृथ्वीवरच्या नाहीत. त्या पँडोरावरून आल्या आहेत. त्या अगदी वेगळ्याच ग्रहावरच्या आहेत. त्या इतक्या सुंदर आहेत की, मी त्यांच्यासाठी एक रॅपसुद्धा लिहिला आहे.

Bollywood
Diljit Dosanjh : दिल्ली-इंदूरनंतर आता बंगळुरूमध्ये दिलजीतच्या कॉन्सर्टला बॉम्बची धमकी; नेमकं काय घडलं?

इतकेच नाही, तर चित्रांगदा यांच्याबद्दल त्यांना इतके आकर्षण आहे की, त्यांच्या मुलाला जोरावरलाही ते दत्तक घेऊ शकतात, असे हनी सिंहने म्हटले होते. तो म्हणाला होता की, मला लहान मुले आवडतात. ती माझी झाली, तर मी तिच्या मुलाची किती चांगल्या प्रकारे काळजी घेईन, याची तुम्हाला कल्पनाही नाही. तसेच मुलांनाही मी आवडतो. तिच्या पतीला (गोल्फपटू ज्योती रंधावा) देखील मी समजावून सांगेन. अरे, ती एक देवी आहे. हनी सिंहच्या या वक्तव्यांवरून त्याला चित्रांगदा किती आवडते आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे, हे स्पष्ट होते.

मुलाखतीत करिअरबद्दलही केले होते भाष्य

या मुलाखतीत हनी सिंहने आपल्या करिअरबद्दलही चर्चा केली होती. चित्रपटासाठी संगीत तयार करणे कठीण असते. ते चित्रपटाचा मूड, व्यक्तिरेखा आणि कथेवर अवलंबून असते, असे त्याने सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी दुसऱ्या कोणाच्या इच्छेनुसार संगीत तयार करू शकत नाही. त्यामुळे एखाद्या चित्रपटासाठी मी केवळ दोन ते तीन गाणीच तयार करेन. तसेच मी कधीही अभिनय करणार नाही.

आपली हिंदी चित्रपटसृष्टी अनेक दिग्गज कलाकारांनी समृद्ध आहे. येथे अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे कलाकार आहेत. मात्र, भारताकडे स्वतःचा मायकेल जॅक्सन नाही. मी भारताला त्यांचा स्वतःचा मायकेल जॅक्सन देईन, असेही हनी सिंह म्हणाला होता.

हनी सिंहने आपल्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत; मात्र त्याने कधीही हार मानली नाही. गेल्या १३ वर्षांत त्याने आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आणि त्यातून यशस्वीपणे मार्गही काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.