Diljit Dosanjh : दिल्ली-इंदूरनंतर आता बंगळुरूमध्ये दिलजीतच्या कॉन्सर्टला बॉम्बची धमकी; नेमकं काय घडलं?

दिलजीतच्या कॉन्सर्टवर बॉम्बस्फोटाचे सावट! धमकीच्या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख
Diljit Dosanjh
Diljit Dosanjh : दिल्ली-इंदूरनंतर आता बंगळुरूमध्ये दिलजीतच्या कॉन्सर्टला बॉम्बची धमकी; नेमकं काय घडलं?file photo
Published on: 
Updated on: 

diljit dosanjh receives bomb threat ahead bengaluru concert khalistan zindabad slogan

पुढारी ऑनलाईन : दिलजीत दोसांझचा २९ नोव्हेंबर रोजी होणारा बंगळुरू येथील कॉन्सर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना आयईडी स्फोट घडवण्याचा इशारा देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. पोलीस या धमकीची सत्यता आणि ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Diljit Dosanjh
Bollywood : दीपिका पदुकोणला वारंवार झाडू मारायला लावल्याने तीच्या डोळ्यात पाणी आले, घरकामवाली बनवले, अनुपम खेर म्हणाले..

पंजाबी गायक आणि ग्लोबल स्टार दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टपूर्वी बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा शो बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. धारवाड पोलीस आयुक्तांना धमकीचा ई-मेल मिळाला असून, त्यामध्ये कॉन्सर्टदरम्यान आयईडी स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे.

२९ नोव्हेंबरला होणार दिलजीतचा कॉन्सर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट २९ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील मडावरा परिसरातील NICE रोड ग्राउंड येथे होणार आहे. याच कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाही लिहिण्यात आली आहे.

Diljit Dosanjh
Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’चा हिरो कधीकाळी स्विगीत डिलिव्हरी बॉय; चित्रपटासाठी १५ लाख नाही, तर मिळाले फक्त..

धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तर लोकांना कॉन्सर्टला मुलांना सोबत न आणण्याचा, आयफोनला उत्तर न देण्याचा आणि मेट्रोने प्रवास न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा संदेश समोर आल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

पोलीस तपासात गुंतले; धमकीची सत्यता समोर येणार

पोलिसांना ई-मेलद्वारे ही धमकी मिळाली आहे. आता तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही धमकी किती गंभीर आणि खरी आहे, याचा शोध पोलीस घेणार आहेत. तसेच ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

सध्या या धमकीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच कॉन्सर्ट रद्द झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होऊन पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.

२०२६ मध्येही दिलजीतच्या कॉन्सर्टवर धमकीचे सावट

दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमांना २०२६ मध्येही धमक्यांचा सामना करावा लागला आहे. सर्वप्रथम दिल्लीमध्ये ३० ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या त्याच्या कॉन्सर्टसंदर्भात सुरक्षा यंत्रणांना धमकीबाबत माहिती मिळाली होती. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत या कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. याचदरम्यान दिल्लीतील सहा शाळांनाही धमकीचे ई-मेल मिळाल्याची बातमी समोर आली होती. या ई-मेलमध्ये विद्यार्थ्यांना कॉन्सर्टला न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

दुसरीकडे, नोव्हेंबरमध्ये इंदूर येथे १५ तारखेला होणाऱ्या दिलजीतच्या कॉन्सर्टपूर्वी तीन खासगी शाळा आणि महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल मिळाले होते. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठालाही धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. १२ नोव्हेंबर रोजी तीन बँका आणि महापौर कार्यालयाला पुन्हा धमकीचे ई-मेल मिळाले. त्यानंतर पोलिसांनी शाळा आणि इतर ठिकाणी तपासणी केली; मात्र कोणतीही स्फोटके आढळली नाहीत.

प्राथमिक तपासात हे ई-मेल बनावट असल्याचे मानले गेले. तसेच एका ई-मेल अकाउंट हॅक झाल्याची बाबही पोलिसांनी समोर आणली होती. म्हणजेच, २०२६ मध्ये दिलजीतच्या दिल्ली आणि इंदूरमधील कॉन्सर्टसंदर्भात वारंवार धमकीचे संदेश मिळाले होते. त्यामुळे कार्यक्रमांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.