Bollywood : दीपिका पदुकोणला वारंवार झाडू मारायला लावल्याने तीच्या डोळ्यात पाणी आले, घरकामवाली बनवले, अनुपम खेर म्हणाले..

दीपिकाची ही अवस्था पाहून अनुपम खेर म्हणाले, तीला हे करावेच लागणार होते, कारण..
Bollywood News
Bollywood : दीपिका पदुकोणला वारंवार झाडू मारायला लावल्याने तीच्या डोळ्यात पाणी आले, घरकामवाली बनवले, अनुपम खेर म्हणाले..file photo
Published on: 
Updated on: 

deepika padukone to play domestic help repeatedly task with sweeping anupam kher rigorous training made her cry

पुढारी ऑनलाईन : आपल्याला एखादा चित्रपटातील नायक किंवा नायिका किती ग्लमरस आहेत. किती प्रसिद्ध आहेत. त्‍यांचे स्टारडम आपणाला दिसते पण तिथपर्यंत पोहोचताना त्‍यांना कराव्या लागलेल्या मेहनतीचे आणि त्‍यागाची माहिती आपणाला नसते. अशीच एक गोष्ट प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण हिच्याविषयी समोर आली आहे ते जाणून घेउयात..

Bollywood News
Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’चा हिरो कधीकाळी स्विगीत डिलिव्हरी बॉय; चित्रपटासाठी १५ लाख नाही, तर मिळाले फक्त..

अनुपम खेर यांनी दीपिका पदुकोणच्या अभिनय प्रशिक्षण शाळेतील एक किस्सा सांगितला. घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारण्यासाठी झाडू मारण्याचा सराव करताना दीपिका त्रासून रडू लागली होती. मात्र, सातत्याने मेहनत घेत तिने त्या भूमिकेतील बारकावे शिकून घेतले.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी तिला रीतसर प्रशिक्षण घ्यावे लागले होते. याच काळात तिने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या ‘अॅक्टर प्रिपेयर्स’ या अभिनय संस्थेत तीन महिन्यांचा कोर्स केला होता. आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2026) मधील एका पॅनल चर्चेदरम्यान अनुपम खेर यांनी दीपिकाच्या प्रशिक्षणाच्या दिवसांतील एक रंजक किस्सा सांगितला आहे. अभिनयाच्या एका साध्या सरावादरम्यान दीपिका इतकी त्रासून गेली होती की तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, असे त्यांनी सांगितले.

Bollywood News
Earthquake : बिहार, बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; नेपाळच्या कोशी प्रांतातही जमीन हादरली

मॉडेलिंगमधून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत होती दीपिका

अनुपम खेर यांनी सांगितले की, दीपिका त्यांच्या अभिनय संस्थेच्या दुसऱ्या बॅचमधील विद्यार्थिनी होती. त्यावेळी तिने मॉडेलिंगच्या जगात स्वतःची ओळख निर्माण केली होती. चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांनी तिला शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी दीपिकाने अभिनयाचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि तीन महिन्यांच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला.

अनुपम यांच्या मते, दीपिकाचे व्यक्तिमत्त्व अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके होते. ती प्रत्येक काम अतिशय व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने करत असे. मात्र, अभिनय करताना तिची हीच सवय कधीकधी व्यक्तिरेखा वास्तववादी पद्धतीने साकारण्यात अडथळा ठरत होती. अनुपम यांनी सांगितले की, दीपिका चहाचा कपही इतक्या स्टाइलमध्ये उचलायची की त्या कृतीत व्यक्तिरेखेचा सहजपणा दिसून येत नसे. त्यांच्या मते, अभिनयात केवळ एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करणे पुरेसे नसते, तर ती परिस्थिती पडद्यावर खरी वाटेल अशा पद्धतीने सादर करणेही महत्त्वाचे असते.

घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारण्यासाठी दिले झाडू मारण्याचे काम

अनुपम खेर यांनी सांगितले की, एके दिवशी त्यांनी दीपिकाला घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारण्यास सांगितले. या सरावामध्ये तिला केवळ जमिनीवर झाडू मारायचा होता. मात्र, दीपिकाने हे कामही तिच्या नेहमीच्या खास आणि सुंदर अंदाजात केले. ती व्यक्तिरेखेतील वास्तव समजून घेण्याऐवजी मॉडेलिंगप्रमाणेच ते सादर करत असल्याचे अनुपम यांच्या लक्षात आले.

यानंतर अनुपम यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला बोलावले आणि तिला जमिनीवर झाडू मारून दाखवण्यास सांगितले. त्या महिलेने अतिशय सहजपणे आणि आत्मविश्वासाने ज्या पद्धतीने झाडू मारला, ते दीपिकासाठी एक उदाहरण होते. त्यानंतर अनुपम यांनी दीपिकाला सांगितले की, जोपर्यंत तिला आपण खरोखरच झाडू मारत आहोत, असे जाणवत नाही, तोपर्यंत तिला हा सराव पुन्हा पुन्हा करावा लागेल.

वारंवार सराव केल्यामुळे दीपिका झाली होती त्रस्त

अनुपम यांच्या मते, एकच सराव सतत पुन्हा करणे दीपिकासाठी सोपे नव्हते. सुरुवातीला ती खूप त्रासून गेली होती आणि तिच्या डोळ्यांत जवळपास अश्रू आले होते. मात्र, तिने हार मानली नाही आणि सराव सुरूच ठेवला. अखेर दीपिकाला अनुपम यांचा मुद्दा समजला आणि तिने ते काम अगदी स्वाभाविक पद्धतीने करायला शिकून घेतले.

अनुपम यांनी सांगितले की, सराव पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने त्यांचे आभारही मानले. या किस्स्याच्या माध्यमातून त्यांनी कलाकारासाठी सातत्याने सराव करणे आणि स्वतःच्या सहज मर्यादेबाहेर जाऊन काम करणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट केले. अभिनयामध्ये मेहनतीसोबतच समजूतदारपणा आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमताही महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले.

‘ओम शांती ओम’मधून मिळाली ओळख, आता ‘किंग’मध्ये दिसणार दीपिका

दीपिका पदुकोणने २००६ मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर २००७ मध्ये फराह खान यांच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. शाहरुख खानसोबतचा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि दीपिकाला रातोरात मोठी ओळख मिळाली.

त्यानंतर तिने ‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘पीकू’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘छपाक’ आणि ‘गहराइयां’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २०१७ मध्ये तिने विन डिझेलसोबत ‘XXX: रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटातून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.

आता दीपिका पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या अॅक्शनपटात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.