Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश

"शहरों में तो बारूदों का मौसम है, गांव चलो यह अमरूदों का मौसम है."
Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश
Published on: 
Updated on: 

bollywood diljit dosanjh addressed bomb threat mumbai concert thanks police

मुंबई : पुढारी ऑनलाईन दिलजीत दोसांझच्या आवाजाची जादू मुंबईतील कॉन्सर्टमध्ये पाहायला मिळाली. आपल्या बेधडक अंदाजाने आणि सुरेल गाण्यांनी त्याने लाखो चाहत्यांना थिरकायला भाग पाडले. एवढेच नव्हे, तर द्वेष पसरवणाऱ्यांनाही प्रेमाचा संदेश देत त्‍याने सर्वांची मने जिंकली.

Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश
Swapna Shastra : स्वप्नात तुम्हालाही दिसतात का या गोष्टी? मग जाणून घ्या 'या' संकेतांचा अर्थ

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या जिद्दीचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आणि सुरक्षेचा धोका असतानाही त्‍याने मुंबईत भव्य कॉन्सर्ट सादर केला. या धमक्यांनंतरही त्याच्या कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येकजण त्याच्या गाण्यांवर नाचताना आणि गाण्यांचा आनंद घेताना दिसला. आपल्या दमदार परफॉर्मन्सदरम्यान दिलजीतने द्वेष पसरवणाऱ्यांना आपल्या खास शैलीत प्रेमाने उत्तर दिले.

दिलजीतचा खास संदेश

दिलजीत म्हणाला की, लोकांना घाबरवून आणि धमकावून त्यांच्या शोला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, चाहत्यांचे प्रेम त्यांना कार्यक्रमापर्यंत घेऊन येते. द्वेष करणाऱ्यांनाही आपण केवळ प्रेमच देणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच, बॉम्बच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले.

दिलजीतच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर मुंबई कॉन्सर्टचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तो स्टेजवरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे.

दिलजीत म्हणाला, "दिलजीतला बॉम्बने उडवून देणार? वाह! यांचा उद्देश फक्त एवढाच आहे की, दिलजीतच्या शोला लोकांनी येऊ नये. लोकांना घाबरवायचे, धमकवायचे आणि कोणत्याही प्रकारे त्‍याला कार्यक्रमाला येण्यापासून रोखायचे."

Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश
Diljit Dosanjh Mumbai Concert: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टसाठी मुंबई पोलीस हाय अलर्टवर; वाहतुकीबाबत नागरिकांसाठी विशेष सुचना

शायराना अंदाजात दिलजीतचे उत्तर

याआधीच्या कॉन्सर्टप्रमाणेच यावेळीही दिलजीतने या परिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांच्या शायरीचा आधार घेतला. त्‍याने शायराना अंदाजात म्हटले, "शहरों में तो बारूदों का मौसम है, गांव चलो यह अमरूदों का मौसम है."

यानंतर दिलजीत म्हणाला, "माझ्याकडून तुम्हाला फक्त प्रेमच मिळेल. तुम्ही जरूर माझ्यावर बॉम्ब फेका, पण माझ्याकडून तुम्हाला प्रेमच मिळेल." यावेळी त्याने आपल्या बालपणाबद्दल आणि संगीतामध्ये असलेल्या गावाच्या संस्कृतीच्या प्रभावाबद्दलही सांगितले.

दिलजीत म्हणाला, "मी जी गाणी गातो, ती गावाशी जोडलेली आहेत. मी स्वतःही गावातून आलो आहे. तुम्हाला माझी गाणी समजली नाहीत, तरी गावच्या मातीचा जो सुगंध आहे, तो तुम्हाला नक्कीच जाणवेल."

मुंबई पोलिसांचे मानले आभार

धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कॉन्सर्टदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवल्याबद्दल दिलजीतने मुंबई पोलिसांचे विशेष आभार मानले.

तो म्हणाला, "पोलिसांचीही एक अडचण आहे. त्यांना प्रत्येकाची तपासणी करूनच आत पाठवावे लागत आहे. थँक यू सो मच! मुंबई पोलिसांचे मनापासून खूप खूप आभार."

दिलजीतने या कॉन्सर्टमध्ये आपली अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. तसेच, काही चाहत्यांची भेटही घेतली. चाहत्यांमधील त्याची क्रेझ या कार्यक्रमात स्पष्टपणे पाहायला मिळाली. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धमक्या आणि द्वेषाला प्रेमाने उत्तर देणाऱ्या दिलजीत दोसांझच्या या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.