

Dashavatar film Collection 10th day
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत सध्या सस्पेन्स थ्रिलर दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपट ‘दशावतार’ची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त दहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय यश मिळवत विक्रमी कमाई केलीय. विशेष म्हणजे, विकेंडचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला झाला आहे. रविवारी (१० वा दिवस) चित्रपटाने तब्बल ३ कोटी रुपयांची कमाई केलीय.
सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि दिलीप प्रभावळकर स्टारर मराठी थ्रिलर 'दशावतार' बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. 'दशावतार' ने बॉक्स ऑफिसवर १० व्या दिवशी जबरदस्त कमाई केलीय. रविवारी या मराठी सस्पेन्स थ्रिलरने ३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत १५.८५ कोटी रुपयांची कमाई केलीय.
पहिल्या आठवड्यातच ‘दशावतार’ने १२ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातील सुरुवातीचे दिवस तुलनेने थोडे शांत असले तरी रविवारी पुन्हा थिएटर हाऊसफुल्ल झाले. एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने १५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अद्यापही ही कमाई पुढे वाढत राहिल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पहिला आठवडा - ९.२ कोटी
दुसऱ्या शुक्रवारी १ कोटी रुपये
शनिवारी २.६५ कोटी रुपये
रविवारी ३ कोटी रुपये
एकूण कलेक्शन १५.८५ कोटी रुपये
दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्री हे पात्र साकारत असून ते कोकण प्रांतातील एक दशावतारी लोकनाट्य कलाकारात असतात. या चित्रपटात महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, भरत जाधव, अभिनय बेर्डे, रवी काळे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.