बर्थडेला दिशाचा ‘कल्की 2898 AD’ मधील लूक; रिलीज आधीच ‘RRR’चा मोडला रेकॉर्ड

Kalki 2898 AD
Kalki 2898 AD

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांचा 'कल्की 2898 AD' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याच दरम्यान चित्रपटाच्या संपुर्ण टिमने त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसूर सोडलेली नाही. दिशाच्या चाहत्यांसाठी आजचा खास दिवस आहे. कारण, त्याच्या लाडक्या अभिनेत्रीचा आज ३२ वा वाढदिवस आहे. एकिकडे दिशाच्या वाढदिवसानिमित्ताने निर्मात्यांनी चाहत्यांना सरप्राईज देत 'कल्की 2898 AD' चित्रपटातील लूक शेअर केलाय. तर दुसरीकडे या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच 'आरआरआर' चित्रपटाचा रिकॉर्ड मोडला आहे.

सर्वाची लाडकी अभिनेत्री दिशा पटानी आज गुरूवारी (दि. १३ जून ) रोजी तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान तिच्या खास वाढदिवसाच्यानिमित्ताने 'कल्की 2898 AD' च्या निर्मात्यांनी तिच्या चाहत्यांनी सरप्राईज देत चित्रपटातील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये दिशा खूपच ग्लॅमरस आणि हटके अंदाजात दिसत आहे. या चित्रपटात दिशाने 'रॉक्सी'ची भूमिका साकारली आहे.

या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये तिने 'Wishing our Roxie, @dishapatani a very Happy Birthday.' असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. दरम्यान या फोटोला बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरने तिचे भरभरून कौतुक करत कॉमेन्टस् केली आहे. या फोटोला १ तासांत ६७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
'आरआरआर' चा मोडला रिकॉर्ड

एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रिलीज होण्यापूर्वीच 'कल्की 2898 AD' हा चित्रपटाने प्री-बुकिंगमधून परदेशात खूपच चांगली कमाई केली आहे. खास करून उत्तर अमेरिकेत या चित्रपटाने एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटाचा विक्रम मोडत काढला आहे. 'कल्की' ने प्री-बुकिंगमध्ये $1 दशलक्ष (भारतीय चलनात ८.३५ कोटी रुपये) पेक्षा जास्त कमाई केली आहे. इतकी कमाई करणारा तो सर्वात मोठा भारतीय चित्रपट बनला आहे. तर 'RRR' ने $1 दशलक्षपर्यंत पोहोचण्यासाठत खूपच वेळ लागला होता. तर निर्मात्यांनी आगामी काळात या चित्रपट $2 दशलक्षच्या घरात पोहोचेल अशी आशा बाळगली आहे.

'कल्की 2898 AD' या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. प्रभास आणि दिशा पटानीसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, बिंग बी अमिताभ बच्चन, कमल हासन, पशुपती, शोभना, ब्रह्मानंदम आणि राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक कलाकारांनी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीजने केली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news