जुनैद खानचा महाराज चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी

महाराज चित्रपट
महाराज चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिलाच चित्रपट 'महाराज' वादात अडकला आहे. विना प्रमोशनच्या हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'महाराज' १४ जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी विना प्रमोशन आणि ट्रेलरच्या थेट चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा-

आमिर खानचा मुलगा जुनैद खान ॲक्टिंगमधून डेब्यू करत आहे. त्याचा चित्रपट 'महाराज' ओटीटीवर रिलीजसाठी तयार आहे. पण, याआधी चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. निर्मात किंवा स्टार्सकडून आतापर्यंत कोणताही टीजर वा ट्रेलर जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे 'महाराज' वर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

अधिक वाचा-

सोशल मीडियावर 'महाराज'वर बंदीची मागणी

हिंदू जनजागृती समितीने केंद्र सरकारला 'महाराज'वर बॅन करण्याची मागणी केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, चित्रपटामध्ये साधू संत आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्यात आली आहे. याशिवाय समितीने चेतावनी देत म्हटले की, जर चित्रपटामुळे कायदेशीर व्यवस्था बिघडली तर यासाठी यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्स जबाबदार असेल.

काय आहे चित्रपटाची कहाणी?

'महाराज' एक पीरियड ड्रामा आहे आणि अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटामध्ये एक हिंदू धार्मिक नेत्याचे चरित्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. अशात विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखेचे म्हणणे आहे की, यामुळे लोकांच्या भावना दुखावतील.

अधिक वाचा-

निर्मात्यांनी घेतला निर्णय

एका रिपोर्टनुसार, व्हायआरएफ आणि नेटफ्लिक्स इंडिया हे प्रकरण वाढवू इच्छत नाही. निगेटिव्ह प्रमोशनपासून वाचण्यासाठी स्टुडिओ त्या रणनीतीचा वापर करत आहे, जे 'पठान' चित्रपटावेळी लागू केलं होतं. सध्या महाराज रिलीज करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news