

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कल्की 2898 एडी'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. ट्रेलर हा खूप उत्कंठावर्धक आहे. या चित्रपटात अनेक उत्तम कलाकार झळकणार आहेत. प्रभासपासून दिशा पटानीपर्यंत प्रत्येक कलाकाराने ट्रेलरमध्ये अनोखी छाप सोडली आहे.
अधिक वाचा –
दिशा पटानीच्या एका झलकने तिच्या फॅन्सची मने जिंकली आहेत. चाहत्यांनी इंटरनेटवर याचे कौतुक केलं आहे. निर्मात्यांनी दिशा पटानीच्या भूमिकेची एक झलक यातून दाखवली आहेत आणि आता दिशाला चाहते पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत! अभिनेत्रीने जेव्हापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, तेव्हापासून तिने एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे.
अधिक वाचा –
अनोख्या भूमिकापासून रोमँटिकपर्यंत दिशाने प्रत्येक भूमिका चोख बजावली आहे. चाहते प्रभाससोबत तिची मैत्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'कल्की 2898 एडी' व्यतिरिक्त दिशा पटानी काही आगामी चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. ती 'वेलकम टू द जंगल' या कॉमेडी फ्लिकमध्ये स्टार होण्यासाठी तयारी करत आहे ज्यामध्ये ती अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि इतरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.
अधिक वाचा –
कल्कि चित्रपट दिग्दर्शक नाग अश्विन द्वारा चित्रपटामध्ये केलेले रिसर्च आणि समर्पणाची एक झलक दाखवते. दिशा पटानीच्या एका झलकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट निर्मात्यांनी दिशा पटानीच्या भूमिकेबद्दल अधिक खुलासा केलेला नाही. पण, तिचा या चित्रपटात 'मोहिनी' असे नाव असल्याचे समजते.