

सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या खूपच चर्चेत आहे. अलीकडेच सन ऑफ सरदार 2 मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर तिची आणि अभिनेता धनुष याच्या अफेअरची चर्चाही जोरदार सुरू झाली. आता तिच्यासोबत आणखी एक वाद समोर येतो आहे. (Latest Entertainment News)
मृणाल मालिकेत काम करत असताना घेतल्या गेलेल्या मुलाखतीचा एक व्हीडियो व्हायरल होतो आहे. यामध्ये मृणाल बिपाशाला बॉडी शेमिंग करताना दिसत आहे. अर्थात आता हा व्हीडियो व्हायरल होतो आहे आणि नेटीझन्स मृणालला प्रचंड ट्रोल करत आहेत.
या व्हीडियोमध्ये मृणालसोबत तिचा कोस्टार अर्जित तनेजा पण आहे. हा व्हीडियो मृणाल जेव्हा कुमकुमभाग्य मालिकेत काम करत होती तेव्हाचा आहे. यामध्ये अर्जित त्याला कशाप्रकारची पत्नी पाहिजे आहे हे सांगताना दिसतो आहे. यावर मृणाल त्याला विचारते की तू अशा मुलीसोबत लग्न करू इच्छितोस जी पुरुषी दिसते आणि तिचे मसल्स असतील? तेव्हा अर्जित म्हणतो त्याला बिपाशा बसूसारखे फिजिक असलेली मुलगी आवडते. यावर मृणाल म्हणते, तर मग जा बिपाशासोबतच लग्न कर जा. तसे पाहता मी बिपाशापेक्षा खूपच चांगली आहे.’
यावर बंगाली बेब बिपाशाने तिला थेट नाही पण सणसणीत उत्तर दिले. बिपाशाने एक इंस्टा स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ‘ 'मजबूत स्त्रिया एकमेकींना आधार देतात. सुंदर स्त्रियांनो तुमचे मसल्स वाढवा. आपण मजबूत व्हायला पाहिजे. मसल्स तुम्हाला उत्तम शारीरिक आणि मानसिक ताकद देण्यास मदत करतात. महिला शारीरिकदृष्ट्या मजबूत होऊ शकत नाहीत, या जुन्या विचारसरणीला आपल्याला छेद द्यावा लागेल.
मृणालच्या एकंदरीत मुलाखातीवर ओरीनेही रंग व्यक्त केला आहे. आपल्या कमेंटमध्ये तो म्हणतो 'ही बाई नक्की काय करून आली आहे?’
मृणाल आगामी Dacoit या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यात तिच्यासोबत अभिनेता आदिवी सेश दिसणार आहे.