Bigg Boss Marathi-6 | कोण घेईल बिग बॉसच्या घराचा निरोप? या आठवड्यात सदस्यांवर टांगती तलवार

Bigg Boss Marathi-6 | कोण घेईल बिग बॉसच्या घराचा निरोप? या आठवड्यात सदस्यांवर टांगती तलवार
Bigg Boss Marathi-6 contestant
Bigg Boss Marathi-6 updates instagram
Published on
Updated on
Summary

बिग बॉस मराठी 6 च्या घरात यंदा एलिमिनेशनची धामधूम पाहायला मिळत आहे. या आठवड्यात अनेक सदस्य नॉमिनेशनमध्ये अडकल्याने घरात टेन्शनचं वातावरण आहे. प्रेक्षकांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आणि कोणाला घराबाहेर जावं लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Bigg Boss Marathi-6 latest updates

बिग बॉस मराठी सहाव्या सीझनच्या घरात रितेश भाऊ या आठवड्यात कुणाला धक्का देणार? या आठवड्यात घरातील स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. बिग बॉस कोणत्या स्पर्धकाला घराचा निरोप देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रुचिता जामदार, सोनाली राऊत, दिपाली सय्यद, करण सोनावणे, ओमकार राऊत, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे या आठ जणांवर एव्हिक्शनची टांगती तलवार आहे. व्होटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत हे दोन सदस्य बॉटम २ मध्ये आहेत.

Bigg Boss Marathi-6 contestant
Ram Charan welcome Twins | चिरंजीवीचा आनंद गगनात मावेना; राम चरण दुसऱ्यांदा झाला पिता, पत्नी उपासनाच्या पोटी जुळ्यांचा जन्म

बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतो की,'ही अवघड वेळ आलेली आहे. कोण या आठवड्यात एलिमिनेट होणार, बघुया महाराष्ट्राने काय ठरवलंय? आज तुमचा प्रवास इथेच संपतोय.'

रितेश भाऊ घेणार शाळा

रितेश भाऊ आठवड्याच्या शेवटी दिव्या शिंदेची शाळा घेणार आहे. त्यामुळे रितेशने दिव्याला खोचक टोमणा दिलाय की, दिव्याने लाडका भाऊ योजना सुरु केलीय. कारण आहे-दिव्या शिंदेचे प्रत्येक वेळी राकेश बापटला समर्थन देणे. तसेच घरात होणाऱ्या चोरी प्रकरणावर सुद्धा रितेश भाऊ भाष्य करणार आहे.

Bigg Boss Marathi-6 contestant
The Kerala Story 2 Goes Beyond |उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, अदिती भाटिया यांचे नवे पोस्टर रिलीज होताच चर्चेत 'केरल स्टोरी-२'

दरम्यान, घाल चुलीत गेममध्ये जे लोक इरिटेडेट करतात, त्या लोकांचे पोस्टर चुलीत घालण्याचा सल्ला रितेश भाऊ देतो. त्यानुसार, स्पर्धक त्या त्या सदस्यांचे फोटो चुलीत घालताना दिसताहेत.

दुसरीकडे, रितेश भाऊ रोशनचे खूप कौतुक करताना दिसतो. बिग बॉसच्या घराचा मान जपणारं वागणं पाहून रितेश भाऊ भावुक होतो.

रितेश भाऊ म्हणतो-'रोशन थोडे इमोशनल झाला. मग बिग बॉसनी तुम्हाला बोलावलं, मोटिवेट केलं. या घरात बिग बॉसचं कुणी ऐकत नाही. नियम तोडले जाता. या घरात बरेच सदस्य बिग बॉसला किंमत देत नाही. पण तुम्ही बिग बॉसच्या पाया पडलात. तुम्ही एक खेळाडू आणि माणूस म्हणून खूप मोठे झालात...'

दरम्यान, सध्याच्या व्होटिंग ट्रेंडनुसार, ओमकार राऊत, सोनाली राऊत यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे १ फेब्रुवारीला कळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news