

‘Bigg Boss Marathi 6’च्या घरात सागर आणि राखी यांनी जबरदस्त धमाल उडवली. सागरने “बाकी कुछ मायने नहीं रखता, डिंपल मायने रखता है” आणि “ये पुष्पा आय लव्ह यू रे” असे म्हणत राखीला छेडले, ज्यामुळे घरातले वातावरण बदलले.
Bigg Boss Marathi-6 news today
बिग बॉस मराठी सीझन ६ सध्याचा सीझन प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन देताना दिसत आहे. घरातील स्पर्धकांमधील भांडणं, मैत्री, टास्क आणि भावनिक क्षण यामुळे प्रत्येक भाग रंगतदार ठरत आहे. मात्र नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सागर आणि राखी यांच्या मस्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
घरातल्या निवांत क्षणी सागरने अचानक फिल्मी अंदाजात राखीला उद्देशून संवाद मारायला सुरुवात केली. “बाकी कुछ मायने नहीं रखता, डिंपल मायने रखता है,” असे म्हणत त्याने राखीच्या डिंपलचे कौतुक केले. त्यानंतर “ये पुष्पा आय लव्ह यू रे…” असा डायलॉग मारत त्याने वातावरणात अधिकच रंगत आणली.
नॅमिनेशनची बादली कुणावर उलटणार?
नॉमिनेशनची बादली टास्क स्पर्धकांची झोप उडवणार आहे. ही पाण्याने भरलेली बादली कुणावर ओतणार आणि यामध्ये सागर असो, अनुश्री माने असो वा दीपाली सय्यद वा रुचिता सर्व स्पर्धकांची झोप उडणार आहे.
रुचिता आणि तन्वीचा वाद विकोपाला?
तन्वी कोलते आणि रुचिता यांच्यात भांडण जुंपलेलं दिसतंय. दोघीजण अजिबात एकमेकींचं ऐकून घ्यायला तयार नाहीत. रुचिता आपला आवाज चढवत म्हणते, आता घर नाही...तिचे तिनं ठरवायचं. मी इथे कुणाच्या फाट्यात पाय अडवायला आले नाही. माझ्य़ात टांग अडवलं की फाटा फाडीन...नेमकं यांच्यात कसामुळे वाद पेटलाय, हे एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.
सागरची घरामध्ये धमाल ...
सागर कारंडे आणि राखीची धमरा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतेय. सागर राखीकडे पाहत म्हणतो-' हे राखी मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय. स्पेशल लोकांसाठी मी हे राखून ठेवलंय कुछ मायने नही रखता...डिंपल मायने रखता है..ये पुष्पा आय लव्ह यू रे...' राखी देखील हसून प्रतिक्रिया देताना दिसते.
रुचिताचे राखीशी भांडण?
तन्वीनंतर राखीचे तन्वीशी वाद झालेला पाहायला मिळतोय. राखीच्या वागण्यामुळे रुचिता वैतागलीय. रुचिता संतापून म्हणते- 'तुला ना मी माहिती नाहिये..तुला जर या पातळीवर उतरायचे ना मी जर ना पातळी सोडली तू हक्की बक्की होशील, आणि तू आता हे पंगे घेतलेत ना आता मी तुला दाखवते मी काय चीज आहे.'