

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये रुचिताने पहारेकरीची भूमिका पार पाडताना नव्या सदस्यांना रात्री झोप उडालीय. तिच्या वागण्यामुळे घरात वाद निर्माण झाला असून या घटनेची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.
Marathi reality show drama Bigg Boss Marathi 6
लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात दररोज नवे ट्विस्ट आणि टास्क पाहायला मिळत आहेत. घरात नुकतेच काही नवे सदस्य दाखल झाले असून त्यांच्या आगमनामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. मात्र, नव्या सदस्यांच्या एंट्रीनंतर पहिल्याच आठवड्यात घरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या आठवड्यात टास्कमध्ये रुचिता आणि नव्याने एन्ट्री झालेली नवी सदस्य रेवा यांच्यात वाद पाहायला मिळाला. दुसरीकडे पाहरेकरी झालेली रुचिताने घरातील सदस्यांची झोप उडवेलली पाहायला मिळतेय. तिला घरातील सदस्यांवर लक्ष ठेवायचे होते.
रेवा आणि रुचिता यांच्यात खडाजंगी
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून आलेली अभिनेत्री रेवा कौरासेची आणि रुचिता यांच्यात जोरदार भांडण झालं. घरात केल्यानंतर काही वेळातच दोघींमध्ये खडाजंगी झाली. हा वाद इतका टोकाला गेल की, रुचिताने रागाच्या भरात रेवाला गेट लॉस्ट म्हटले.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये रुचिताचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये रुचिता म्हणते- 'जागते रहो म्हणत रुचिता पहारा देतेय..जागे आहेत का सगळे? पॉवर कीच्या धमक्या आम्हाला देऊ नका...पन्नास दिवस झाले आम्ही बघितलंय..तुम्ही आज आलात...यांनी मला का जागवलं. यांना मी झोपू देऊ, इतकी मी चांगली आहे नाही.. मी आधीच सांगितलं होतं की, मला मायग्रेन आहे..मला जर मायग्रेन जालं तर मी अख्ख्या घराला मायग्रेम देणार'
रेवा आणि रुचिता यांच्यात खडाजंगी
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून आलेली अभिनेत्री रेवा कौरासेची आणि रुचिता यांच्यात जोरदार भांडण झालं. घरात केल्यानंतर काही वेळातच दोघींमध्ये खडाजंगी झाली. हा वाद इतका टोकाला गेल की, रुचिताने रागाच्या भरात रेवाला गेट लॉस्ट म्हटले.
नेमकं कारण काय?
समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये रेवा रुचिताला म्हणते, "बाहेर लोकांचं असं झालंय की रुचिताला बंद करा यार, आवाज नाही ऐकायचाय हिचा" यावर रुचिता संतापते -मी तुला काही विचारलं नाहीये. आली मोठी शहाणी.
हे सगळं करून तू छान दिसत नाहीयेस, असे रेवा म्हटल्यानंतर रुचिता भडकते. ती म्हणते- मी छान दिसतेय, वाईट दिसतेय, मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यानंतर रेवा तिचा हात धरते, त्यावेळी रुचिता मात्र चांगलीच भडकते आणि डोन्ट टच मी म्हणत गेट लॉस्ट म्हणते.
अभिनेत्री रेवा कौरासे विविध मालिकांमध्ये दिसली होती. 'दुहेरी', 'लग्नाची बेडी'मध्ये ती दिसली होती.