New Marathi movie | घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा चेहरा..रहस्यमय कथा घेऊन येतोय 'तुंबाडची मंजुळा'

New Marathi movie | घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा चेहरा..रहस्यमय कथा घेऊन येतोय 'तुंबाडची मंजुळा'
New Marathi movie poster
New Marathi movie aanounced pudhari photo
Published on
Updated on
Summary

तुंबाडची मंजुळा’ हा नवीन मराठी चित्रपट रहस्य आणि थराराने भरलेली कथा घेऊन येतो आहे. अर्धवट बंद दाराआड दिसणाऱ्या चेहऱ्याच्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या गूढ कथेमुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि रोमांचक अनुभव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

New Marathi movie tumbaadchi manjula

विविध कोरगावकर या नव्या दिग्दर्शकाचा चित्रपट तुंबाडची मंजुळा येत आहे. आज होळीच्या निमित्ताने या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. एक गुढ पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे, जे पाहिल्यानंतर काहीतरी रहस्यमय असल्याचं दिसतं.

New Marathi movie poster
Tom Holland-Zenday secret marriage | टॉम हॉलेंड-अभिनेत्री झेंडायाने आधीच लग्न केलंय का? 'स्पायडर मॅन' कपलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

काहीशी गूढ वातावरणातील आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक गोष्ट निर्माते घेऊन येत आहेत. 'तुंबाडची मंजुळा' असे या चित्रपटाचं नाव आहे. होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

हे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागलीय. कारण पोस्टरमध्ये एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात... असे दृश्य दिसतेय. जणू काय घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत, असे भासवणारे हे हे पोस्टर अतिशय लक्षवेधी ठरलं आहे.

New Marathi movie poster
Toxic Tabaahi Song : यश-कियाराच्या चित्रपटाचे पहिले गाणे 'तबाही' रिलीज, पण चाहते का झालेत नाराज?

झी स्टुडिओज, उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांची निर्मिती असून हा चित्रपट येत्या ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी रिलीज होणार आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार, कथा काय असेल, तुंबाडची मंजुळा कोण आहे, या सर्व गोष्टी गुलदस्त्यातच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news