बिग बॉस मराठी 4 : अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा?

bigg boss Marathi 4
bigg boss Marathi 4
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला, प्रत्येक टास्कनुसार आपण नाती आणि ग्रुप बदलताना बघतो. अमृता धोंगडे आणि तेजूची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलायला येतात. आज यशश्री आणि तेजस्विनीमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. ज्यामध्ये ती तेजुला सल्ला देताना दिसणार आहे.

यशश्रीचे म्हणणे आहे, मी प्रसादशी बोलत होते वरती कारण एकदा बोलून परत क्लिअर करणं गरजेचं आहे. जे काही शिफ्टिंग झालं आहे त्यामुळे एवढा फरक नाही पडणार. इकडचे दोन प्यादे जर तिकडे शिफ्ट झाले आहेत तसेच तिकडचे दोन प्यादे कुठेतरी जाऊ पाहत आहेत ते प्यादे इथे शिफ्ट होऊ शकतात. ती मैत्री तू मैत्री म्हणून ठेवणार आहे ? कि परत इथे ग्रुपिजम होणार आहे ? तेजस्विनीचे म्हणणे आहे, मला तिच्यासोबत २ – ३ गोष्टी वैयक्तिक लेव्हलवर क्लिअर करायच्या आहेत. ते झालं तर ठीक नाही तर एक Housemate सारखं… यशश्रीचे यावर म्हणणे आहे, ते तुझ्यावर आहे, पर्सनल equation पर्सनल ठेव, ग्रुपची लॉयलीटी आता ग्रुपकडे राहू देत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news