

Bigg Boss 19 Weekend Ka Vaar
मुंबई - सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' ला जवळजवळ एक महिना पूर्ण झाला आहे. रात्री 'वीकेंड का वार' चा चौथा आठवडा सुरू झाला आहे, जिथे सलमान पुन्हा एकदा घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. या आठवड्यात सलमान युट्यूबर मृदुल तिवारीवर निशाणा साधलाय. त्याच्या कमकुवत खेळाबद्दल त्याला फटकारले आणि असेही म्हटले की, 'जर हे असेच चालू राहिले तर युट्यूबरचे फॉलोअर्सही त्याला वाचवू शकणार नाहीत.' दरम्यान, यावेळी वीकेंड का वारमध्ये एका स्पेशल गेस्टची एन्ट्री होतेय.
गेल्या आठवड्यात फराह खान, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी बिग बॉस १९ च्या घरात धुमाकूळ घातला होता. पण यावेळी शोच्या 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानसोबत एक खास गेस्ट येईल. यावेळी, चाहत्यांना जबरदस्त मनोरंजनासोबतच सलमानसोबत रियुनियन पाहायला मिळेल.
या आठवड्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोल बिग बॉस १९ च्या घरात येईल. काजोल तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर स्पष्टवक्त्यासाठी ओळखली जाते. बेधडक काजोलमुळे शोचा मनोरंजनाचा भाग वाढणार आहे.
काजोल सध्या तिच्या वेब सीरीज ‘द ट्रायल २’ मुळे चर्चेत आहे. ती घरातमध्ये वेब सीरीजचे प्रमोशन करेल. सोबतच ती शोच्या मंचावर सीरीजशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्टी सांगेल.
बिग बॉस १९ च्या सेटवर काजोल कन्फ्यूज
बिग बॉस-१९ च्या सेटवर काजोल मीडियाला भेटायला झाली. मंचावर येताच काजोलचा ड्रेस तिच्या हिल्समध्ये अडकला. आधी काजोलला समजले नाही की तिच्यासोबत काय होत आहे. पण नंतर बॉलीवुड अभिनेता जीसू सेनगुप्ताने तिला आधार दिला. त्यावेळी ती आपला ड्रेस सरळ करताना दिसली.
दीर्घकाळानंतर सलमान खान - काजोल एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रेक्षकांची ही जोडी नेहमीच आवडती ठरली आहे. आता पुन्हा दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहणे, 'सोने पे सुहागा' दिसणार आहे.