

Abhishek Bajaj-Shehbaz Fight in Bigg Boss 19 house
मुंबई : बिग बॉस १९ च्या नव्या प्रोमोत शहबाज बदेशा आणि अभिषेक बजाज यांच्यात भांडण लागलेलं दिसत आहे. सोबतच घरात किचनची दबाबदारी कोण सांभाळणार यावरून अमाल मलिक भडकलेला दिसत आहे. परिणामी, बिग बॉसला कडक पाऊल उचलावे लागले. रिपोर्टनुसार, दोन्ही कंटेस्टेंट शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा आणि अभिषेक बजाज यांना संपूर्ण सीजनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. या वृत्ताने फॅन्सही हैराण झाले आहेत. कारण, एका कंटेस्टेंटने तर या आठवड्यातच एन्ट्री घेतलीय.
शहबाज आणि अभिषेक यांच्यातील भांडणाला कारणीभूत कुनिका सदानंद कारणीभूत ठरली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गायक अमाल मलिक किचनच्या जबाबदारीवरून भडकला आहे.
जेव्हा अमालसोबत अभिषेक आणि कुनिका सदानंद वाद घालत होते, तेव्हा शहबाज आणि अभिषेक यांच्या वाद सुरु झाला. कुमिका म्हणते, रिस्पेक्ट... शो करू नकोस ...मनात नसेल तर.. यावर अभिषेक उत्तर देताना म्हणतो, रिस्पेक्ट कमवावं लागतं. या दोघांच्यात शहबाज बादेशा पडतो आणि कुनिकाचे समर्थन करत म्हणतो की, दिवसा तू हलवा मागतोस त्यांच्याकडे आणि आता अशा गोष्टी करतोस त्यानंतर शहबाज-अभिषेक या दोघांमधील वाद वाढतो.
अभिषेकला खूप राह येतो आणि तो म्हणतो की, आता आता आला आहेस तू, ज्यादा बोलू नकोस. नंतर दोघे एकमेकांना धक्का देतात. नंतर धक्काबुक्की होते, घरच्यांना म्ध्ये पडून भांडण थांबवावं लागतं. निर्मात्यांनी ही क्लिप पाहिल्यानंतर निर्णय घेतात की, शहबाज बादेशा आणि अभिषेक बजाज यांना संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं जाईल.