नीलमला आली चक्कर, बसीर अलीचा पारा चढला! Bigg Boss -19 च्या घरातले सगळे सामान गायब

चहापूड-साखरसहित Bigg Boss च्या घरातले सर्व सामान गायब, बसीर अली-नीलमला संताप अनावर
Bigg Boss -19
Bigg Boss -19 latest updates Instagram
Published on
Updated on

Bigg Boss -19 latest updates Basir Ali angry

मुंबई – कलर्स वाहिनीवरील सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो बिग बॉस-१९ प्रेक्षकांसाठी दररोज नवनवीन ट्विस्ट घेऊन येतो. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये प्रेक्षकांना धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. घरातील सदस्य नीलमला अचानक चक्कर आली. ती कोसळल्याने काही क्षण घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. इतर स्पर्धकांनी तिला तातडीने मदत केली.

याच दरम्यान बसीर अलीचा राग अनावर झाला. घरातल्या काही सदस्यांच्या वागणुकीमुळे तो चांगलाच संतापला. त्याचा आवाज उंचावला आणि त्यामुळे घरात वातावरण तापलं. नेहमी शांत दिसणाऱ्या बसीरचा हा अवतार पाहून बाकी सदस्यही चक्रावले.

Bigg Boss -19
Hardik Pandya-Mahieka Sharma | कोण आहे माहिका शर्मा? हार्दिक पंड्यासोबत रंगलीय डेटिंगची चर्चा

परंतु एवढ्यावरच थांबत नाही. बिग बॉसच्या आदेशानंतर घरातलं संपूर्ण सामानच गायब झालं. स्पर्धकांना जेवण, वस्तू, कपडे काहीच न सापडल्याने घरात हाहाकार माजला. काही सदस्यांनी या टास्कमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर काहीजण संतापून एकमेकांवरच राग काढू लागले.

Instagram

बसीर अली, नीलम गिरी, अभिषेक बजाज भडकतात. घरातील सामान गायब होण्यामागे अमल मलिक - शहबाज बादशाह कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. पण घरच्या सदस्यांना वाटतं की हे बिग बॉसचे कोणते तरी सीक्रेट टास्क आहे. पण सर्वांचा पारा तेव्हा हाय होतो, जेव्हा त्यांना समजते की, बिग बॉसने सामान गायब केलेलं नाही.

Bigg Boss -19
Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer: कॉमेडी-रोमान्सचा फुल्ल तडका; जान्हवी-वरुणच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहाच

चहापूड-साखर सर्व गायब

'बिग बॉस १९' च्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, बसीर अली कॅप्टन अमल मलिकला म्हणतो- त्याच्या साहित्याशी छेडछाड करण्यात आली आहे. संपूर्ण कंटेनर खाली आहे. यानंतर कुनिका सदानंद देखील म्हणते-सर्व मसाले गायब आहेत. चहापूड-साखर सर्व गायब आहे.

bb19 contestant
Instagram

नीलमला आली चक्कर

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, सर्व सदस्य साहित्य जसे सोफा-काऊच अचलून साहित्य शोधत आहेत. पण गौरव खन्ना तर्क लावतो की, ११० टक्के हा सीक्रेट टास्क आहे. तेव्हा नीलम गिरीचा पारा हाय होतो आणि ती म्हणते की, मीठाविना तिला चक्कर येतेय. बसीर संतापतो आणि म्हणतो, त्याला त्याचे साहित्य वापस पाहिजे. अभिषेक बजाज म्हणतो- 'ज्याच्याकडे सामान सापडले, त्याला सोडणार नाही.'

Neelam Giri
Neelam GiriInstagram
कोण आहे नीलम गिरी?
बिग बॉसमध्ये भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीची चर्चा आहे. ती उत्तर प्रदेशातील बलिया गावची राहणारी आहे. तिने आपले शिक्षण पटनातून पूर्ण केले असून अनेक चित्रपटात काम केले आहे. पवन सिंहसोबत तिचे अनेक म्युझिक व्हिडिओ आहेत. निरहुओ, खेसारी लाल यादव या अभिनेत्यांसोबतही तिने काम केले आहे. 'यूपी ६१ लव्ह स्टोरी ऑफ गाजीपूर', 'टुन टुन', 'इज्जत घर', 'कलाकंद' आणि 'जस्ट मॅरिड' अशा चित्रपटात तिने काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news