Bigg Boss 19 | बिग बॉसच्या घरात सत्तापालट, कुनिका सदानंदला सोडावे लागले कॅप्टन पद

Bigg Boss 19 | बिग बॉसच्या घरात सत्तापालट, कुनिका सदानंदला सोडावे लागले कॅप्टन पद
image of kunika sadanand and ashnoor kaur
Bigg Boss 19 latest updates Instagram
Published on
Updated on

Bigg Boss 19 Kunickaa Sadanand resigns captaincy

मुंबई - बिग बॉस १९ च्या घरात काही ना काही नेहमीच ट्विस्ट आलेलं दिसतं. सलमान खानच्या शोमध्ये सत्तापालट झालेले दिसते. घरात कुणीका सदानंद यांचे कॅप्टनसी पद गेलं आहे आता त्यांच्या जागी अशनूर कौऱला स्पेशल पॉवर मिळाल्याचे दिसते.

image of kunika sadanand and ashnoor kaur
Prarthana Behere-Priya Marathe | 'कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण..', प्रिया मराठेच्या आठवणीत प्रार्थनाची भावूक पोस्ट

पहिल्या आठवड्यात एलिमिनेशन नाही

अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, नतालिया जानोसजेक, नगमा मिराजकर, अभिषेक बजाज, बसीर अली, नेहल चुडासमा, गौरव खन्ना, अशनूर कौर, मृदुल तिवारी, फरहाना भट्ट, नीलम गिरी, प्रणित मोरे, जीशान कादरी, कुनिका सदानंद हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण पहिल्या आठवड्यात घरातून कुणाचे एलिमिनेशन झालेले नाही. पण आता दुसरीकडे, कुनिका सदानंदने आपल्या कॅप्टनसी पदाचा राजीनामा दिला आहे.

बिग बॉसला मिळाला नवा कॅप्टन

बिग बॉस १९ मध्ये कुनिका सदानंदने आपल्या कॅप्टनसी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशनूर कौर नवी कॅप्टन बनलीय. रिपोर्टनुसार, हा ड्रामॅटिक बदल तेव्हा समोर आला जेव्हा कुनीका सदानंद यांची जीशान कादरी, बसीर अली आणि अन्य स्पर्धकांसोबत घरातील काम आणि निर्णयांवरून तीव्र वादावादी पाहायला मिळाली. कुनिका सदानंद संतापल्या आणि जोरदार भांडणे झाली. कुनिकाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कॅप्टन पद सोडण्याची घोषणा केली.

image of kunika sadanand and ashnoor kaur
Param Sundari BO Collection | काय सांगताहेत विकेंडचे आकडे, परम सुंदरीला मिळाला संडेचा फायदा, कोटींचा वर्षाव
अशनूर कौरला मिळाली स्पेशल पॉवर, नॉमिनेट होणार?
नवी कॅप्टन अशनूर कौरला या आठवड्यात इम्युनिटी देखील मिळाली आहे. याचा अर्थ असा की, आता या आठवड्यात तिचे नॉमिनेशन होणार नाही. कॅप्टन झाल्यानंतर आता आता अशनूर कौरचा स्वभाव कसा बदलेल, हे पाहणं रंजक असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news