भूमीची ‘ती’ पहिली कमाई

भूमीची ‘ती’ पहिली कमाई
Published on
Updated on

भूमी पेडणेकर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. तिने 2015 मध्ये अभिनेत्री या नात्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'दम लगा के हईशा'पासून तिने कारकिर्दीची सुरुवात केली. तिच्या बहुतांशी चित्रपटात काही ना काही सामाजिक संदेश दडलेला असतो.

भूमीने आता स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच या गुणी अभिनेत्रीने एका मुलाखतीत असे सांगितले की, तिने एकवेळ पंकज त्रिपाठी व रणवीर सिंह यांचेही ऑडिशन घेतले होते. भूमीने यावेळी यशराज फिल्म्सकडून मिळालेल्या पहिल्या धनादेशाच्या आठवणीला उजाळा दिला. भूमीने एका मुलाखतीत असे सांगितले की, तो धनादेश 7 हजार रुपयांचा होता आणि तो धनादेश तिने आपल्या आईकडे सुपूर्द केला होता. भूमीने उमेदवारीच्या कालावधीत कर्ज घेतले होते आणि प्रारंभिक टप्प्यात कामे मिळू लागल्यानंतर तिने परतफेड सुरू केली. वायआरएफमध्ये भूमीला असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून संधी मिळाली. भूमीने सहा वर्षे या पदावर काम केले आणि त्यानंतर विविध प्रोडक्शन हाऊसमध्येही नोकरी केली. यादरम्यान तिने पंकज व रणवीर यांचे ऑडिशन घेतले होते. योगायोगाने हे दोघेही आज स्टार आहेत. भूमीने त्यावेळी पंकजची 'पावडर' चित्रपटासाठी तर रणवीरची 'बँड बाजा बारात'साठी ऑडिशन घेतली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news