Batwara1947 Trailer : 'हर इंसान का पहला मजहब मां है', सनी देओलच्या दमदार संवादाने जिंकली चाहत्यांची मनं (व्हिडिओ)

Batwara1947 Trailer : 'हर इंसान का पहला मजहब मां है', सनी देओलच्या दमदार संवादाने जिंकली प्रेक्षकांची मनं (व्हिडिओ)
Batwara1947 movie
Batwara1947 Trailer outInstagram
Published on
Updated on

Batwara1947 Trailer released

सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या बहुचर्चित 'बटवारा १९४७' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. देशाच्या फाळणीच्या काळातील वेदना, माणुसकी, त्याग आणि धार्मिक संघर्ष यांची मांडणी या ट्रेलरमध्ये करण्यात आली आहे. अॅक्शनसोबतच भावनिक प्रसंगांनी सजलेल्या या ट्रेलरमध्ये सनी देओलचा दमदार अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे.

Batwara1947 movie
Ravi Mohan Divorce Case |अभिनेते रवी-आरती घटस्फोट वादात नवा ट्विस्ट; न्यायालयाने ४० लाखांची मागणी नाकारली

देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव सुरू असतानाच धार्मिक तणाव आणि हिंसाचाराचे चित्रही दाखवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सनी देओलचे पात्र आपल्या कुटुंबासह पाकिस्तानमध्ये आश्रय घेते. त्यांना राहण्यासाठी एक घर मिळते; मात्र त्या घरात आधीपासूनच एक वृद्ध हिंदू महिला (शबाना आझमी) लपून राहत असते.

घरातील मंदिर पाडण्याचा प्रयत्न होताच सनी देओल त्याला ठाम विरोध करतो. "मंदिर तोडणे म्हणजे इस्लाम नव्हे," असे म्हणत तो माणुसकीच्या बाजूने उभा राहतो. यानंतर धार्मिक संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतो. ट्रेलरच्या शेवटी सनी देओलचा प्रभावी संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेतो. "आईला हिंदू-मुस्लिम अशा चौकटीत विभागू नका. प्रत्येक माणसाचा पहिला धर्म म्हणजे त्याची आई असते." असा संवाद ऐकू येतो.

Batwara1947 movie
Jana Nayagan Box Office Collection Day 5: ‘जन नायकन’च्या कमाईत घट, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई?

तो म्हणतो - मंदिर तोडना इस्लाम नहीं है. मजहब को लेकर बड़ी जंग छिड़ जाती है. ट्रेलरच्या शेवटी सनीचा दमदार डायलॉग दिसतात. तो म्हणतो - ''आग लगा दूंगा पूरे शहर को. वो हिंदू औरत नहीं एक मां है, मां को हिंदू-मुसलमान में न बांटिए. मां अपने आप में एक मजहब है. हर इंसान का पहला मजहब मां है. हर बच्चे के मुंह से निकला पहला शब्द मां है.''

भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रसिद्ध साहित्यिक असगर वजाहत यांच्या 'जिस लाहौर नहीं वेख्या, ओ जम्याई नई' या गाजलेल्या नाटकावर प्रेरित आहे. चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत शबाना आझमी, अली फजल, करण देओल आणि अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

विशेष म्हणजे, जवळपास तीन दशकांनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र आली आहे. याआधी त्यांनी 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक'सारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली असून, संगीती ए. आर. रहमान यांनी दिले आहे.

'बटवारा १९४७' हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अनेक वर्षांनंतर सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र मिळाले असून,प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news